---Advertisement---

‘दीर्घ श्वास घे आणि त्या पत्रकाराचे नाव सांग’, सेहवागचा वृद्धिमान साहाला सल्ला

On: बुधवार, फेब्रुवारी 23, 2022 4:44 PM
Virender-Sehwag-Wriddhiman-Saha
---Advertisement---

भारतीय संघाचा (team India) अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा (Wriddhiman Saha) सध्या चर्चेचा विषय बनला आहे. साहाने त्याच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून एका पत्रकाराने त्याला धमकावण्याचा प्रयत्न केल्याचा खुलासा केला होता, पण यावेळी साहाने त्या पत्रकाराचे नाव मात्र उघड केले नव्हते. याच पार्श्वभूमीवर आता सर्वजण साहाला आग्रह करत आहे की, त्याने त्या पत्रकाराचे नाव उघड करावे. भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यानेही त्याचे समर्थन केले होते आणि आता सेहवागने एक खास ट्वीटर पोस्टही केली आहे.

साहावर जेव्हा त्या पत्रकाराचे नाव उघड करण्यासाठी दबाव बनू लागला, तेव्हा त्याने यासाठी स्पष्टपणे नकार दिला. सुरुवातीला त्याने एका वृत्तपत्रासोबत बोलताना सांगितले की तो त्या पत्रकाराचे नाव उघड करणार नाही.

त्यानंतर मंगळवारी पुन्हा एक ट्वीटर पोस्ट करून त्याने लिहिले की, “मी विचार केला की, अशाप्रकारचा व्यवहार सहन नाही केला पाहिजे आणि मला असेही नाही वाटत की, कोणावरही अशाप्रकारच्या परिस्थितीतून जाण्याची वेळ यावी. मी निर्णय घेतला की, बाहेर जाऊन लोकांपूढे चॅटचा खुलासा करावा, पण त्याच्या नावाची घोषणा करायला नको.”

“माझा स्वभाव असा नाही की, मी कोणाचे करियर बरबाद होईपर्यंत एखाद्याचे नुकसान करेल. त्यामुळेच माणूसकीच्या नात्याने त्याच्या कुटुंबाकडे पाहून, सध्या मी त्याचे नाव उघड करणार नाही. परंतु अशा प्रकाराची पुनरावृत्ती झाली, तर मी माघार घेणार नाही,” असे साहाने ट्वीटमध्ये सांगितले. साहाच्या या ट्वीटला रिट्वीट करत सेहवागने त्याल एक महत्वाचा सल्ला दिला आहे.

साहाने घेतलेल्या या भूमिकेनंतर विरेंद्र सेहवागने त्याला सल्ला दिला की, “प्रिय वृद्धिमान हा तुझा स्वभाव नाही की, तू दुसऱ्यांना नुकसान पोहोचवशील आणि तू खूप चांगला मुलगा आहे. पण भविष्यात असे कुणासोबतच होऊ नये, त्यांना वाचवण्यासाठी हे गरजेचे आहे की, तू त्याचे नाव सांगावे.” पुढे सेहवागने लिहिले की, “मोठा श्वास घे आणि नाव सांगून टाक.”

दरम्यान, वृद्धिमान साहाने शेअर केकेल्या ज्या स्क्रिनशॉटमुळे हा सर्व वाद सुरू झाला, तो एका वॉट्सअप चॅटला होता. त्या पत्रकाराने साहाला मुलाखतीसाठी विचारणा केली होती. साहाने कसल्याही प्रकारे प्रत्युत्तर न दिल्यानंतर त्या पत्रकाराकडून त्याल धमकावण्याचा प्रयत्न केला गेला होता. याच चॅटचा स्क्रिनशॉट साहाने अधिकृत ट्वीटरवर शेअर केला होता.

महत्वाच्या बातम्या –

Photo: श्रीलंकेविरुद्ध दोन हात करण्यास टीम इंडिया सज्ज; रोहित-द्रविडच्या देखरेखेखाली भारतीय खेळाडूंचा जोरदार सराव

‘सर्व ठिक, पण…’, कर्णधार रोहित शर्मा झाला पत्नी रितिकाकडूनच ट्रोल

ना डॉक्टर.. ना औषधे.. ना दर्जेदार जेवण; खडतर परिस्थितीवर मात करत यंग इंडियाने जिंकला विश्वचषक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---