शनिवारी (१९ डिसेंबर) ऍडलेड येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात पहिल्या कसोटी सामना झाला. गुलाबी चेंडूने खेळण्यात आलेल्या या दिवसरात्र सामन्यात भारताला ८ विकेट्सने पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे ऑस्ट्रेलिया संघ चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. या सामन्यादरम्यान भारतीय संघाने दुसऱ्या डावात अतिशय वाईट प्रदर्शन केले. त्यामुळे चाहत्यांपासून ते क्रिकेट दिग्गजांपर्यंत सर्वजण भारतीय संघावर टीका करत आहेत.
माजी भारतीय विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग यानेही ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय संघाची दुसऱ्या डावातील धावसंख्या लिहत हा विसरून जाण्याजोगा ओटीपी आहे, असे त्याने म्हटले आहे.
https://twitter.com/virendersehwag/status/1340168652906135552?s=20
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक वसीम जाफार यांनीही ट्विटद्वारे नाराजी व्यक्त केली आहे. “कधी-कधी खूप जास्त आनंद, खूप मोठ्या दु:खात कसा बदलतो याचा अनुभव मी आज घेतला,” असे त्यांनी लिहिले आहे.
https://twitter.com/WasimJaffer14/status/1340169270471192576?s=20
https://twitter.com/WasimJaffer14/status/1340156532776783875?s=20
चाहत्यांनी मीम्स शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अधिकतर चाहत्यांनी युवा फलंदाज पृथ्वी शॉ आणि भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना धारेवर धरले आहे. एका चाहत्याने, तर शास्त्रींना उद्देशून “अब जिंदा रेहने के लिये बचा ही क्या है” असे मिम शेअर केले आहे. तसेच एका चाहत्याने शास्त्री ड्रेसिंग रूममध्ये गेल्यानंतर पृथ्वी शॉला रागवतानाचा फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटोवर “तुझ्यामुळे माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली,” असे लिहिले आहे.
चाहत्यांनी शेअर केले मीम्स:
https://twitter.com/AnkitdDreamer/status/1340165981147033600?s=20
https://twitter.com/safahkhan8/status/1339945262563864576?s=20
https://twitter.com/OfficiallyKapil/status/1340167726371762177?s=20
https://twitter.com/Joker87009983/status/1340167149071953920?s=20
https://twitter.com/Axmeh_45/status/1340170523368632320?s=20
Word of Legend:- Prithvi Shaw have ability like Sachin Sehwag and Lara #INDvAUS
Ravi Shastri always rocks 🍻 pic.twitter.com/Wf9CLZLVpf
— Priyanshu Rai (@itsPRB) December 18, 2020
पहिल्या कसोटी सामन्याचा आढावा
पहिला डाव
ऍडलेड ओव्हल स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना २४४ धावा केल्या. यात कर्णधार विराट कोहलीच्या सर्वाधिक ७४ धावांचा समावेश होता. त्याने ८ चौकारांच्या मदतीने ही धावसंख्या गाठली होती. त्याच्याव्यतिरिक्त चेतेश्वर पुजाराने ४३ धावा आणि अजिंक्य रहाणेने ४२ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना मिचेल स्टार्कने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या होत्या. तर पॅट कमिन्सनेही ३ विकेट्सची कामगिरी केली होती.
भारताच्या पहिल्या डावातील २४५ धावांचा पाठलाग करत ऑस्ट्रेलिया संघ १९१ धावांवर सर्वबाद झाला होता. पॅट कमिन्सने सर्वाधिक नाबाद ७३ धावा केल्या होत्या. त्याच्याव्यतिरिक्त मार्नस लॅब्यूशानेने ४७ धावांचे योगदान दिले होते. उर्वरित फलंदाजांना २० धावाही करता आल्या नाहीत. भारताकडून गोलंदाजी करताना आर अश्विनने ४ विकेट्स, उमेश यादवने ३ विकेट्स आणि जसप्रीत बुमराहने २ विकेट्स घेतल्या होत्या.
दुसरा डाव
पुढे भारतीय संघाने केवळ ३६ धावांवरच त्यांचा दुसरा डाव घोषित केला. ऑस्ट्रेलियन गोलंदाज जोश हेजलवुड आणि पॅट कमिन्सच्या भेदक गोलंदाजीमुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला. हेजलवुडने सर्वाधिक ५ आणि कमिन्सने ४ विकेट्स घेतल्या. दरम्यान एकही भारतीय फलंदाज दोन आकडी धावा करू शकला नाही. प्रत्युत्तरात मॅथ्यू वेड आणि जो बर्न्सच्या दमदार फलंदाजीने ऑस्ट्रेलियाला सामना जिंकून दिला. बर्न्सने ५१ धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. तर मॅथ्यू वेडनेही ३३ धावांचा हातभार लावला.
महत्त्वाच्या बातम्या-
अब जिंदा रेहने के लिये बचा ही क्या है! टीम इंडियाच्या वाईट प्रदर्शनानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस
तीन बदक आणि लाजीरवाणा पराक्रम..! पाहा दुसऱ्या डावातील भारतीय फलंदाजांची सुमार कामगिरी