जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना निर्णायक वळणावर आहे. शनिवारी (10 जून) भारतीय संघाने दुसऱ्या डावात फलंदाजीला सुरुवात केली. भारताची सलामीवीर जोडी रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांगल्या लयीत दिसत होती. मात्र, तितक्यात गिल कॅमरून ग्रीनच्या हातात झेलबाद झाला. पंचांनी गिलला बाद दिल्यामुळे सध्या सोशल मीडियावर वाद सुरू आहे. अशातच भारताचा माजी दिग्गज विरेंद्र सेहवाग यानेही याविषयी नाराजी व्यक्त करत पंचांनावर निशाणा साधला आहे.
भारतीय संघाला या सामन्यात विजयासाठी शेवटच्या डावात 444 धावांचे लक्ष्य मिळाले. शुबमन गिल (Shubman Gill) आणि रोहित शर्मा दुसऱ्या डावात फलंदाजीला आल्यानंतर संघाला त्यांनी चांगली सुरुवात दिली होती. मात्र, डावातील आठव्या षटकात शुबमन गिल 18 धावा करून तंबूत परतला. या षटकात स्कॉट बोलाँड (Scott Boland) गोलंदाजी करत असून कॅमरून ग्रीन (Cameron Green) याच्या हातात गिलने विकेट गमावली. गिलची विकेट ही संशयास्पद होती. पण तिसरे पंच रिचर्ड कॅटलब्रो (Richard Kettleborough) यांनी त्याला बाद घोषित केले. व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडिओत ग्रीनच्या हातातील चेंडू जमिनीला टेकल्याचे दिसते. याच पार्श्वभूमीवर विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) देखील सोशल मीडियावर व्यक्त झाला आहे.
सेहवागने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या व्यक्तिची फोटो पोस्ट केला आहे. सेहवागने या फोटोतून पंचांची अपस्था दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, “शुबमन गिलचा निर्णय देताना तिसरे पंच. तुम्हाला खात्री नव्हती, तर गिल नाबादच होता.” सेहवागच्या या पोस्टवर देखील नेटकरी वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होत आहेत.
Third umpire while making that decision of Shubman Gill.
Inconclusive evidence. When in doubt, it’s Not Out #WTC23Final pic.twitter.com/t567cvGjub
— Virender Sehwag (@virendersehwag) June 10, 2023
गिलच्या विकेटमुळे विरेंद्र सेहवागव्यतिरिक्त इतरही दिग्गजांनी नाराजी व्यक्त केली. यात सुनील गावसकर (Sunil Gavaskar) आणि रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्या नावाचाही समावेश आहे. शास्त्री असेही म्हणाले की, “जर फलंदाज यावेली स्टीव स्मिथ असता, तर निर्णय फलंदाजाच्या बाजूने दिला गेला असता.” सुनील गावसकरांच्या मतेही गिल नाबाद होता. (Virender Sehwag criticized the umpires for dismissing Shubman Gill)
महत्वाच्या बातम्या –
सलामीचा सरदार म्हणून रोहित ठरतोय सुपरहिट! सचिन-सेहवागनंतर आता फक्त हिटमॅनचं नाव
कांगारूंच्या दुसऱ्या डावात स्मिथ अन् हेडवरही भारी पडला कॅरे, नाबाद राहत केली ‘ही’ खास कामगिरी