---Advertisement---

खराब फॉर्मात असलेल्या धवनला सेहवागचा कानमंत्र, म्हणाला, “फलंदाजीसाठी मैदानात आल्यावर….”

On: रविवार, डिसेंबर 6, 2020 4:13 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुक्रवारी (4 डिसेंबर) झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन 1 धाव करून तंबूत परतला. वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने त्याला स्विंग चेंडूवर त्रिफळाचित केले. त्यामुळे ‘स्विंग चेंडू’ धवनची कमजोरी आहे, अशा चर्चा जोर धरू लागल्या. यातच भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने धवनची पाठराखण केली आहे.

धवनने थोडा वेळ घ्यावा – सेहवाग

विरेंद्र सेहवाग म्हणाला, “उच्च दर्जाच्या गोलंदाजांविरुद्ध धावा करणे, सलामीवीर फलंदाजासाठी अवघड असते. मी सुद्धा अशा परिस्थितीतून गेलो आहे. ऑस्ट्रेलियामध्ये नवीन चेंडूने धावा करणे सोपे नाही. याच कारणामुळे मला असे वाटते की, शिखर धवनला आणखी थोडा वेळ द्यावा. फलंदाजीसाठी मैदानात आल्यावर त्यानेही थोडा वेळ घ्यावा.”

फिरकी गोलंदाजांविरुद्ध करावी आक्रमक खेळी

“केएल राहुल धवनसह सलामीला येतो. तो सध्या चांगल्या फॉर्मात आहे आणि वेगवान धावाही करत आहे. अशा परिस्थितीत धवनने स्ट्राइक बदलत डाव पुढे न्यावा आणि फिरकी गोलंदाजांविरुद्ध आक्रमक खेळी करावी. यामुळे तो चांगली भागीदारी करू शकतो,” असेही पुढे बोलताना सेहवाग म्हणाला.

धवनला मिळायला हवी संधी

आगामी टी20 सामन्यात भारतीय संघात बदल झाल्यास धवन संघात कायम राहील, असा विश्वास सेहवागने व्यक्त केला. याबद्दल बोलताना तो म्हणाला, “अनुभवी खेळाडूंचा अभाव असल्यामुळे असे काही घडेल असे मला वाटत नाही. धवन संघात असेल आणि त्याला संधी मिळायला हवी, असे मला वाटते.”

धवनला डच्चू मिळेल, असं वाटत नाही

पुढे बोलताना सेहवाग म्हणाला की, “वनडे मालिकेत 25 ते 30 धावा केल्यावर तो त्या खेळीचे एका मोठ्या खेळीत रूपांतर करू शकला नाही. पण आयपीएलमधील त्याचा फॉर्म पाहता, पुढील दोन टी20 सामन्यात त्याला डच्चू मिळेल, असं वाटत नाही. त्याला बराच अनुभव आहे आणि जेव्हा तो टिकून खेळतो, तेव्हा विजयात मोलाचे योगदान देतो.”

महत्त्वाच्या बातम्या –

दुर्दैव म्हणतात ते हे! विराटकडून झेल सुटूनही ऑस्ट्रेलियन कर्णधार झाला रनआऊट, पाहा Video

द्विशतकाचे निरुत्साही सेलिब्रेशननंतर विलियम्सन झाला ट्रोल; ‘या’ सहकाऱ्यानेच उडवली खिल्ली

दक्षिण आफ्रिका वि. इंग्लंड : पहिली वनडे पुन्हा रद्द; यावेळी खेळाडू नाही हॉटेल स्टाफला कोरोनाची लागण

ट्रेंडिंग लेख –

‘बर्थडे बॉय’ रविंद्र जडेजाबद्दल या खास १० गोष्टी माहित आहेत का?

मराठीत माहिती- क्रिकेटर आरपी सिंग

भारताच्या ‘या’ ५ दिग्गज क्रिकेटपटूंचा आज आहे वाढदिवस

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---