भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज विरेंद्र सेहवाग याला पृथ्वी शॉ याचे वागणे पटत नसल्याचे दिसते. सेहगाने नुकतीच याविषयी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे. पृथ्वी शॉ आयपीएल 2023 मध्ये सुमार खेळी करताना दिसला. सततच्या निराशाजनक खेळीनंतर शॉने बुधवारी () याच्यावर पंजाब किंग्जविरुद्ध हंगामातील पहिले अर्धशतक केले.
पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) दिल्ली कॅपिटल्सचा नियमित सलामीवीर राहिला आहे. पण खराब फॉर्ममुळे यावर्षी आयपीएलमध्ये काही सामन्यांत त्याला प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर बसवले गेले. आयपीएल 2023मध्ये खेळलेल्या 7 सामन्यांमध्ये शॉ अवघ्या 101 धावा करू शकला. त्याची सरासरी 14.2 राहिली. सलामीवीराकडून दिल्लीला नक्कीच अशा प्रदर्शनाची अपेक्षा नव्हती. आयपीएल 2023 पूर्वीही शॉ मागच्या मोठ्या काळापासून धावा करण्यासाठी झगडत आहे. विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag ) याच्या मते शॉने वरिष्ठ खेळाडूंसोबत स्वतःहून बोलले पाहिजे आणि त्यांचा अनुभव जाणून घेतला पाहिजे. सेहवागने यावेळी एक प्रसंगही सांगितला, जेव्हा शॉ आणि त्याच्यासोबतच्या शुबमन गिल यांनी त्यांच्याशी चर्चा करणे टाळले होते.
एका माध्यमावर सेहवाग म्हणाला, “एकदा पृथ्वी शॉ माझ्यासोबत एक जाहिरात शूट करत होता. त्यावेळी शुबमन गिल देखील उपस्थित होता. त्या दोघांनी माझ्याशी चर्चाही केली नाही. त्याठिकाणी मी 6 तास होतो, दोघांपैकी एकही माझ्याकडे आला नाही. तुम्हाला जर अनुभव हवा असेल, तर संपर्क करण्याची गरज पडेलच.”
गावसकरांनी यावेळी आपल्या कारकिर्दीतील सुरुवातीच्या दिवसांचीही आठवण काढली. त्यावेळी प्रशिक्षक जॉन राइट होते. सुनील गावसकर यांच्याशी ओळख करून घेण्यासाठी सेहवागने जॉन राइटकडे मदत मागितली होती. सेहवाग म्हणाला, “भारतीय संघात नवीन होतो, तेव्हा सुनील गावसकरांसोबत संपर्क साधायचा होता. प्रशिक्षक जॉनी राइटला मी म्हणालो की, त्यांच्याशी माझी भेट घडवून आणा. कारण ते मला भेटतील की नाही, हे माहीत नव्हते. त्यानंतर जॉनी राईटने मला जेवणासाठी आमंत्रित केले होते. आकाश चोप्राला मी सोबत घेऊन येईल असे मी सांगितले होते. त्यानंतर मी आणि आकाश त्याठिकाणी गेलो होतो. सुनील गावसकरी त्याठिकाणी आले होते. जेवण करताना आम्ही सावसकरांशी बराच वेळ चर्चा केली. या भेठिचा खूप फायदा झाला. कोणताच अनुभवी खेळाडू तुमच्याशी चर्चा करण्यासाठी स्वतः येणार नाही. तुम्हालाच त्यांच्याकडे जावे लागेल.”
(Virender Sehwag expressed displeasure over Prithvi Shaw’s arrogance)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दारुण पराभवानंतर खचून गेला SRHचा हेड कोच; म्हणाला, ‘आमचे खेळाडू चांगले खेळले, पण विराटने…’
राष्ट्र प्रथम! आयपीएल खेळतोय तरी विराटचे लक्ष WTC फायनलवर, सामन्यानंतर म्हणाला…