इंडियन प्रीमियर लीग 2020 मध्ये रविवारी (8 नोव्हेंबर) झालेल्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्ल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. या विजयासह दिल्लीने अंतिम फेरीत प्रवेश केला. आता मंगळवारी (10 ऑक्टोबर) होणाऱ्या अंतिम सामन्यात दिल्ली मुंबई इंडियन्सचा सामना करेल. या सामन्याआधी भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने खास प्रतिक्रिया दिली आहे.
हैदराबादविरुद्धच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्लीचा अष्टपैलू फलंदाज मार्कस स्टॉयनिस सलामीला आला होता. त्याने 27 चेंडूत 38 धावा फटकावल्या आणि दुसर्या टोकाला फलंदाजी करत असलेल्या धवनलाही उत्तम साथ दिली.
याबद्दल बोलताना माजी भारतीय सलामीवीर वीरेंद्र सेहवागने आयपीएल फ्रँचायझी त्याच्या नि: शुल्क सल्ल्याचा चांगला उपयोग करत असल्याचे सांगितले. तो गंमतीच्या मूडमध्ये होता. या प्रकरणात त्याने स्टॉयनिसचे उदाहरण दिले. सेहवागने स्टॉयनिसबद्दल दिल्ली कॅपिटल्सला याआधीही एक सल्ला दिला होता.
सेहवागने आयपीएल 2020 च्या दुसर्या क्वालिफायर सामन्याचा आढावा घेताना आपल्या फेसबुक पेजवरील व्हिडिओमध्ये सांगितले की, “दिल्ली कॅटिल्सने फलंदाजीचा निर्णय घेतला. पण मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं. जशी मी सूचना दिली होती, त्यानुसार मार्कस स्टॉयनिस सलामीला आला होता. मी तुम्हाला सांगतो, ते सर्व माझ्या विनामूल्य सल्ल्याचा फायदा घेत आहेत.”
या सामन्यात हैदराबादचा गोलंदाज जेसन होल्डरने स्टॉयनिसचा झेल सोडला. हैदराबाद संघाला ही चूक महागात पडली, असे सेहवाग म्हणाला.
अंतिम सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर मुंबई इंडियन्सने या हंगामात आतापर्यंत दिल्ली संघाविरुद्ध तीन सामने खेळले आहेत आणि तिन्ही सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाचा पराभव झाला आहे. त्यामुळे मुंबई या सामन्यात फेव्हरेट असेल. मात्र, जो संघ चांगली कामगिरी करेल तोच संघ विजयी होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
AUS vs IND : आता मैदानात घुमणार प्रेक्षकांचा गजबजाट; ऑस्ट्रेलिया क्रिकेटने केली मोठी घोषणा
IPL FINAL : धवन, पंत, हेटमायर सारख्या डावखुऱ्या फलंदाजांसाठी मुंबई ‘हा’ गोलंदाज उतरवणार मैदानात
IPL – फायनलपूर्वी सचिन तेंडुलकरचा मुंबईला खास संदेश, प्रत्येक खेळाडूला ‘ही’ गोष्ट समजायला हवी
ट्रेंडिंग लेख-
चौथी शिकलेल्या पोराच्या फिरकीपुढे भल्याभल्यांनी घेतलीये गिरकी; वाचा मुंबईच्या प्रमुख फिरकीपटूबद्दल
विराट… ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यातून सोडलास तरीही आम्हाला तुझा अभिमान वाटतोय






