---Advertisement---

“वॉर्नर सरावापेक्षा जास्त पार्ट्या करायचा, सतत टीममेट्सशी भांडल्यामुळे संघाबाहेरही केले होते”

On: शनिवार, मे 7, 2022 4:22 PM
David-Warner
---Advertisement---

डेविड वॉर्नर हा इंडियन प्रीमियर लीग २०२२मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग आहे. त्याने या संघाते प्रतिनिधित्त्व करताना दमदार खेळ दाखवला आहे. आता याच वॉर्नरविषयी भारताचा माजी क्रिकेटपटू आणि दिल्ली संघाचा माजी कर्णधार विरेंद्र सेहवाग याने काही उलगडे केले आहेत. एका कर्णधाराच्या रूपात वॉर्नरला सांभाळणे फार कठीण होते, असे सेहवाग म्हणाला आहे. 

वर्ष २००९ मध्ये सेहवाग (Virender Sehwag) दिल्ली कॅपिटल्स (त्यावेळची दिल्ली डेअरडेविल्स) (Delhi Capitals) संघाचा कर्णधार होता. वॉर्नर (David Warner) तेव्हा पहिल्यांदाच आयपीएल खेळत होता आणि दिल्ली संघाचा भाग होता. परंतु त्याला शिस्तीत वागवणे फार कठीण होते. कारण तो ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंशी वाद घालत असायचा. त्याच्या वागणूकीमुळे व्यवस्थापनाला त्याला परत पाठवावे लागले होते.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

वॉर्नरबद्दलचा एक रोमांचक किस्सा (Virender Sehwag Revealation About David Warner) सांगताना सेहवागशी क्रिकबजला म्हणाला की, “मी देखील बऱ्याच खेळांडूवर राग व्यक्त केला आहे. वॉर्नर त्यापैकी एक होता. कारण तो तेव्हा नवानवा संघात सहभागी झाला होता. त्यावेळी त्याला सराव करणे किंवा सामना खेळण्यापेक्षा पार्टी करायला जास्त आवडायचे. पहिल्याच वर्षी त्याचे बऱ्याच खेळाडूंशी भांडण झाले होते. म्हणून आम्ही त्याला शेवटच्या २ सामन्यांमधून बाहेर काढले होते. बऱ्याचदा असे होते की, तुम्ही कोणाला धडा शिकवण्यासाठी काहीतरी करता.”

“तो नवा होता. अशात त्याला हे दाखवणे महत्त्वाचे होते की, तो एकटाच संघासाठी महत्त्वाचा नाहीय, इतर खेळाडूंनाही तितकेच महत्त्व आहे. बरेच दुसरे खेळाडूही होते, जे खेळू शकत होते आणि संघाला सामने जिंकून देऊ शकले असते. झालेही असेच. आम्ही वॉर्नरला संघाबाहेर ठेवले आणि ते सामनेही जिंकले होते,” असे पुढे बोलताना सेहवाग म्हणाला.

डेविड वॉर्नरची बॅट ओकतेय आग
वॉर्नरने या हंगामात ८ सामने खेळताना ५९.३३ च्या सरासरीने ३५६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ४ अर्धशतके निघाली आहेत. तसेच त्याने त्याची जुनी फ्रँचायजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध धुव्वादार खेळीही केली आहे. त्याने हैदराबादविरुद्ध नाबाद ९२ धावांची प्रशंसनीय खेळी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

एकच मारला पण सॉलीड मारला! इशान किशनने तेवतियाला खेचला १०४ मीटरचा षटकार, Video व्हायरल

साई सुदर्शन आयपीएलमध्ये ‘हिट विकेट’ होणारा पहिलाच नाही, ‘हे’ १२  खेळाडूही झालेत असेच आऊट

क्रिकेटमध्ये कसा करण्यात येतो खेळपट्टी झाकण्यासाठी कव्हर्सचा उपयोग, जाणून घ्या काय आहेत नियम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---