Shikhar Dhawan : भारतीय संघाचा अनुभवी सलामी फलंदाज शिखर धवनने आज (24 ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. जवळपास 14 कारकीर्द संपवून धवन आता आपल्या आयुष्याचा दुसरा डाव खेळायला तयार आहे. निवृत्तीनंतर अनेक आजी माजी खेळाडू प्रतिक्रिया देत आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याचा साथीदार राहिलेला भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने देखील त्याच्या निवृत्तीनंतर आपली प्रतिक्रिया दिली.
शिखरच्या निवृत्तीनंतर सेहवागने लिहिले, ‘अभिनंदन शिखर. जेव्हापासून तू मोहालीत माझी जागा घेतलीस तेव्हापासून तू मागे वळून पाहिले नाहीस. गेल्या काही वर्षांत काही उत्तम परफॉर्मन्स दिले. तु मजा करत राहा. पूर्ण आयुष्य असेच आनंदाने जग. तुला सदैव शुभेच्छा.’
यासोबतच माजी भारतीय संघ सहकारी आणि सध्याचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यानेही निवृत्तीबद्दल त्याचे अभिनंदन केले. शिखरने 2013 मध्ये खराब फॉर्ममध्ये असलेल्या सेहवागची जागा घेतली होती. त्याने त्या सामन्यात 187 धावा करत आपले स्थान मजबूत केलेले.
शिखर याने यापूर्वीच आपण निवृत्त होणार असल्याचे संकेत दिले होते. आपली निवृत्ती जाहीर करताना त्याने आपल्याला संधी देणाऱ्या दिल्ली क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआयचे आभार मानले. यासोबतच त्याने आपले कुटुंब, सहकारी खेळाडू व चाहत्यांना देखील धन्यवाद दिले. तो आयपीएलमध्ये मात्र खेळताना दिसण्याची शक्यता आहे.
Badhaai ho Shikkhi. Ever since the time you replaced me in Mohali, you didn’t look back and some top performances over the years. May you continue to have fun and live life to the fullest. Very best wishes always. https://t.co/jHvfLAhp14
— Virender Sehwag (@virendersehwag) August 24, 2024
शिखर धवनच्या क्रिकेट कारकिर्दीबाबत बोलायचे झाल्यास, शिखरने ऑक्टोंबर 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या वनडे प्रकारामधून भारतासाठी पदार्पण केले होते. त्याने भारतासाठी 34 कसोटी सामने खेळले. ज्याच्या 58 डावात त्याने 2315 धावा केल्या. तर 167 वनडे सामन्यात त्याने भारताचे प्रतिनिधीत्व केले. ज्यामध्ये त्याने 17 शतके आणि 39 अर्धशतकांच्या जोरावर 6793 धावा केल्या आहेत. टी20 क्रिकेटबाबात बोलायचे झाल्यास त्याने 68 सामने खेळल्या आहेत. ज्यामध्ये त्याने 1759 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 11 अर्धशतकांचा समावेश आहे. यासोबतच तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीसाठी खेळत होता.
महत्त्वाच्या बातम्या-
“रिकाम्या हातानं आलो, रिकाम्या हातानं जाणार”, निवृत्तीनंतर शिखर धवनची पहिली प्रतिक्रिया
“मी शाळेतही कधी सस्पेंड झालो नव्हतो”, ‘कॉफी विथ करण’मधील वादावर राहुलचं मोठं वक्तव्य
निवृत्त झाल्यानंतरही धवनचा दबदबा कायम! सेना देशात अशी कामगिरी करणारा एकमेव सलामीवीर