---Advertisement---

कोणत्या दोन गोलंदाजांना वीरेंद्र सहवाग घाबरायचे? कपिल शर्मा शोमध्ये केला खुलासा

On: शनिवार, ऑगस्ट 9, 2025 7:54 PM
Virendra-Sehwag
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचे माजी सलामीवीर वीरेंद्र सहवाग यांच्या (Virendra Sehwag) फलंदाजीवर संपूर्ण जग फिदा होतं. मैदानात उतरून ते ज्या पद्धतीने क्रिकेटप्रेमींचं मनोरंजन करायचे, ते पाहून प्रत्येकजण आनंदून जायचा. आजही लोकांना त्याची स्फोटक फलंदाजी आठवते. वेगवान गोलंदाज असो किंवा फिरकीपटू, ते कोणाच्याही विरोधात बिनधास्त फलंदाजी करायचे. शोएब अख्तर आणि ब्रेट ली यांच्याविरुद्धही त्याचं प्रदर्शन अफलातून होतं. त्या काळात हे दोघे जगातील अत्यंत धोकादायक वेगवान गोलंदाज मानले जायचे.

पण लोकांच्या मनात नेहमी एक प्रश्न असायचा, सहवागला त्यांच्या कारकिर्दीत कधी एखाद्या गोलंदाजाविरुद्ध फलंदाजी करताना भीती वाटली का? हा प्रश्न कपिल शर्मा शोमध्ये उपस्थित झाला. शोच्या जज अर्चना पूरण सिंह यांनी विचारलं, वीरू, फलंदाजी करताना कोणाच्या गोलंदाजीला सामोरं जाताना तुला भीती वाटायची?

यावर सहवाग यांनी पहिल्यांदा माजी श्रीलंकन फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनचं नाव घेतलं. ते म्हणाले, सर्वात जास्त भीती जर कुणापासून वाटली असेल तर ती मुरलीधरनपासून. ते स्पिनर होते. त्यांचे चेंडू मला समजत नसायचे. कोणता फिरणार, कोणता बाहेर जाईल ते ओळखता यायचं नाही. त्यांच्या नंतर जर कुणापासून भीती वाटली असेल तर तो शोएब अख्तर होता. कारण त्याचा काही भरोसा नव्हता. कोणता चेंडू चेहऱ्यावर येईल आणि कोणता पायाजवळ येईल, काही सांगता यायचं नाही.

सहवाग यांनी भारतासाठी 104 कसोटी, 251 एकदिवसीय आणि 19 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. कसोटीत 180 डावांत त्यांनी 49.34 च्या सरासरीने 8586 धावा केल्या. एकदिवसीय सामन्यांत 245 डावांत 35.06 च्या सरासरीने 8273 धावा, तर टी20 मध्ये 18 डावांत 21.89 च्या सरासरीने 394 धावा केल्या. गोलंदाजी करताना कसोटीत 91 डावांत 47.35 च्या सरासरीने 40 बळी, आणि एकदिवसीय सामन्यांत 146 डावांत 40.14 च्या सरासरीने 96 बळी घेतले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---