ब्रिस्बेन कसोटीच्या शेवटच्या दिवशी ३०० हून अधिक धावांचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवून मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाला पहाटेच पहिला धक्का बसला. सलामीवीर रोहित शर्मा पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर अवघ्या ७ धावा करत झेलबाद झाला. पण युवा फलंदाज शुबमन गिल आणि अनुभवी कसोटीपटू चेतेश्वर पुजारा यांनी मिळून संघाचा डाव सावरला. दरम्यान पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट रसिकांना गिलच्या जबरदस्त फटकेबाजीचे दर्शन घडले. त्याच्या फलंदाजीला पाहता भारताचा माजी विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग याने खास शब्दात त्याची पाठ थोपटली आहे.
विरेंद्र सेहवागचे हटके ट्विट
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री पूजा भट्ट यांच्या एका चित्रपटाचा पोस्टर झळकवत सेहवागने भन्नाट ट्विट केले आहे. त्याने लिहिले की, “ऑस्ट्रेलियाने या सत्रात त्यांचे सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न केला. तरीही शुबमन गिलच्या प्रदर्शनाला पाहून ते नक्कीच असे म्हणत असतील की, ‘गिल है की मानता नहीं’.”
“भारतीय संघाच्या दिवसाची ही अप्रतिम सुरुवात आहे. पुढील अजून दोन सत्रात गिलने असेच प्रदर्शन करावे आणि मग तिसऱ्यांदा बॉर्डर-गावसकर ट्रॉफीवर भारतीय संघाचे नाव कोरले जाईल,” असे त्याने पुढे लिहिले.
विरू नावाने प्रसिद्ध सेहवाग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. तो सतत हटके शब्दात ट्विट करत क्रिकेटपटूंचे कौतुक करत असतो. त्यामुळे क्रिकेट रसिकांना त्याच्या ट्विटची नेहमीच उत्सुकता लागलेली असते.
https://twitter.com/virendersehwag/status/1351356245828018182?s=20
अवघ्या ९ धावांनी हुकले गिलचे शतक
गिलने पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रापासून बचावात्मक पण आक्रमक फलंदाजी केली. ६२.३३च्या स्ट्राईक रेटने २ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने ९१ धावांची आतिशी खेळी त्याने केली. या खेळीसाठी त्याने १४६ चेंडू खेळले. अखेर ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायन याने स्टिव्ह स्मिथच्या हातून त्याला झेलबाद केले. त्यामुळे अवघ्या ९ धावांनी गिलचे पहिले कसोटी हुकले. असे असले तरी, गिलने पुजारासोबत मिळून शतकी भागिदारी रचली.
महत्त्वाच्या बातम्या-
शुभमन गिलच्या जबरा फलंदाजीचा लाल रुमालाशी आहे संबंध, घ्या जाणून
Video : रोहित शर्माच्या रूपात भारताला पहिला धक्का; टीम पेनने घेतला अप्रतिम झेल






