---Advertisement---

“ये नया भारत… घर में घुस कर मारता है”, भारताच्या मालिका विजयानंतर विरेंद्र सेहवागचं ट्विट तुफान व्हायरल

On: मंगळवार, जानेवारी 19, 2021 6:38 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेतील  चौथा सामना ब्रिस्बेन येथील गाबा मैदानावर मंगळवारी(१९ जानेवारी) पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला 3 विकेट्स राखून पराभूत केले. या विजयानंतर भारतीय संघाचे गाबा येथे विजयाचे स्वप्न अखेर सत्यात उतरले. त्याचबरोबर भारतीय संघाने ही कसोटी मालिका 2-1 अशा फरकानी जिंकली. या विजयानंतर भारतीय संघाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग म्हणाला, ये नया भारत है.. घर मे घुसकर मारता है.

ऑस्ट्रेलिया संघाने दुसर्‍या डावात भारतीय संघाला विजयासाठी 328 धावांचे लक्ष्य दिले होते. हे आव्हान भारतीय संघाने 96.6 षटकांत 7 गडी गमावून पार केले. यामुळे भारतीय संघाचा 3 विकेट्स राखून विजय झाला. त्याचबरोबर भारतीय संघाचे 32 वर्षापासून स्वप्न होते की, गाबा येथे आपल्या पहिल्या विजयाची नोंद करायची. ते आज 32 वर्षांनी पूर्ण झाले. त्यामुळे भारतीय संघाचे अभिनंदन करताना माजी खेळाडू विरेंद्र सेहवागने एक ट्विट केले आहे. जे सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

भारतीय संघाचा माजी  स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग यांनी ट्विट करताना लिहले, ” खुशी के मारे पागल. ये नया इंडिया है. घर मे घुसकर मारता है. एॅडलेडमध्ये झालेल्या कसोटीनंतर ते आजपर्यंत भारताच्या युवा खेळाडूंनी सर्वांना आनंद दिला आहे. आपण विश्वचषक याअगोदर जिंकला आहे, परंतु आजचा विजय खूप महत्वाचा आहे. आणि हो पंतमुळे हा विजय जास्त महत्त्वाचा ठरला आहे. “या ट्विट सोबत विरेंद्र सेहवागने एक गमतीशीर फोटो जोडला आहे. ज्यामधे ट्रकची मागची बाजू दिसत आहे. ज्यावर मजेदार वाक्य लिहिली आहेत.

ऑस्ट्रेलिया संघाने दिलेल्या 328 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून सर्वाधिक जास्त धावा शुबमन गिलने केल्या. त्याने 146 चेंडूचा सामना करताना 8 चौकार आणि 2 षटकार यांची आतिषबाजी करताना दमदार 91 धावांची खेळी केली. त्याचबरोबर भारतीय संघाची अभेद्य भिंत चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचे आक्रमण आपल्या अंगावर झेलत 201 चेंडूचा सामना करताना 7 चौकार ठोकून महत्त्वपूर्ण 56 धावांची खेळी केली. त्याने भारतीय संघाची एक बाजू लावून धरली.

त्यांनंतर भारतीय संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंतने मोक्याच्या क्षणी फलंदाजीला येत, ऑस्ट्रेलिया गोलंदाजाचा खरपूस समाचार घेताना नाबाद 89 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 138 चेंडूचा सामना करताना 9 चौकार आणि 2 षटकार खेचत नाबाद 89 धावा केल्या. तसेच 96.6 षटकात विजयी चौकार ठोकत भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

महत्त्वाच्या बातम्या –

विलक्षण योगायोग! बाप विराटच्या आणि आता लेकीच्या जन्मावेळीही घडलाय तोच इतिहास; जाणून घ्या

केवळ आजी-माजी क्रिकेटपटूंनीच नाही तर इंग्लंडच्या या फुटबॉलपटूकडूनही टीम इंडियाला मिळाल्या शुभेच्छा

ब्रिस्बेन कसोटी जिंकत ‘त्या’ नकोश्या विक्रमाला टीम इंडियाने पाडला खंड, वाचा सविस्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---