भारतीय संघाचा खेळाडू इशांत शर्मा आपल्या वेगवान गोलंदाजी तसेच लांब केसांसाठी सुद्धा ओळखला जातो. ज्यावेळी इशांत १९ वर्षांखालील क्रिकेटमध्ये निवडला गेला. त्यावेळी त्या संघाच्या प्रशिक्षकाने त्याचे केस छोटे करायला सांगितले होते आणि जर अस केले नाही तर त्याला १०० डॉलर दंड भरावा लागेल असे सांगितले होते. परंतु त्यावेळी इशांत बोलला होता की, मी दंड भरायला तयार आहे. पण मी माझे केस नाही कापणार. भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज मुनाफ पटेल यानेसुद्धा इशांतच्या केसांबाबत एका आठवणीचा किस्सा सांगितला आहे.
मुनाफने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, “मी सुरुवातीपासूनच इशांतसाठी गुरुप्रमाणे होतो. नेहमी माझ्या लहान भावाप्रमाणे तो माझे बोलणे ऐकायचा आणि केवळ मीच नाही तर गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग सुद्धा जेव्हा त्याच्याशी बोलायचे तेव्हा देखील तो त्यांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकत असे. इशांत आपल्या केसांबद्दल खूप सकारात्मक होता आणि आम्ही याचा फायदा घेऊन त्याला त्रास देण्याची कोणतीही संधी सोडत नव्हतो.”
महा स्पोर्ट्सचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
मुनाफ पुढे म्हणाला की, “आम्ही एकदा श्रीलंका दौऱ्यावर गेलो होतो, तेव्हा त्याला खूप रडवले होते. त्यावेळी त्याचे केस खूप मोठे होते. अशात सेहवाग म्हणाला की, चला आपण त्याचे केस कापूयात. हे वाक्य ऐकल्यावर इशांत घाबरून इकडे तिकडे पळू लागला आणि गंभीरला मदतीसाठी विनवण्या करू लागला. मी त्याला पकडले आणि सेहवाग कात्री घेऊन आला. त्यावेळी तो जणू शाळकरी मुलासारखा रडत होता. त्यांनतर त्याला आम्ही सोडले आणि त्याची ती फजिती पाहून आम्हाला हसू आवरणे कठीण होऊन बसले होते.”
मुनाफ पटेल याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत १३ कसोटी सामने खेळले आहेत. त्यात ३५ विकेट्सचा समावेश आहे. त्यानंतर ६३ आयपीएल सामने खेळले असून ७४ विकेट्स हस्तगत केल्या आहेत. तर ७० एकदिवसीय सामन्यात ८६ विकेट्स घेण्यात तो यशस्वी ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाच्या विश्वविजयावर आधारित ‘८३’ सिनेमाच्या प्रदर्शनाची तारिख ठरली, ‘या’ दिवशी होणार रिलीज
गंभीर आजारने ग्रस्त, मृत्यूशी दिली झुंज, आता गाजवतोय क्रिकेटचं मैदान; वाचा त्याचा थक्क करणारा प्रवास
Video: ‘लाज नाही वाटत का, काय गाणं बनवलंय; माझी पोरं बोलायची बंद झालीत’, PSLचे गाणे पाहून भडकला शोएब