इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल 2023चा मिनी लिलाव शुक्रवारी (दि. 23 डिसेंबर) कोची येथे पार पडला. यामध्ये एकापेक्षा एक खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची बोली लागली. यामध्ये भारताचा अनकॅप्ड (राष्ट्रीय संघाकडून न खेळलेला खेळाडू) खेळाडू मयंक डागर यानेही 20 लाख रुपयांच्या मूळ किंमतीत आपले नाव नोंदवले होते. अशात सनरायझर्स हैदराबाद संघाने मयंकवर विश्वास दाखवला आणि त्याच्यावर कोट्यवधी रुपयांची बोली लावत आपल्या ताफ्यात सामील केले.
मयंक डागर हैदराबादच्या ताफ्यात
खूप कमी क्रिकेटप्रेमींना माहिती असेल की, मयंक डागर (Mayank Dagar) हा भारतीय संघाचा माजी सलामीवीर विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याचा भाचा आहे. मयंक सेहवागसारखा विस्फोटक नाहीये, पण तो अष्टपैलू कामगिरीसाठी ओळखला जातो. मयंकचे वडील जितेंद्र डागर हे देखील विद्यापीठ स्तरावर क्रिकेट खेळले आहेत. ते सध्या दिल्ली महानगरपालिकेत (एमसीडी) कंत्राटदार आहेत.
https://www.instagram.com/p/BhlZpdmDWNL/?utm_source=ig_web_copy_link
मयंकला आयपीएल 2023च्या मिनी लिलावात (IPL 2023 Mini Auction) सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाने 1.80 कोटी रुपये मोजत ताफ्यात सामील केले. विशेष म्हणजे, मयंकसाठी यावेळी राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघांमध्ये चांगलीच शर्यत पाहायला मिळाली. मात्र, शेवटी हैदराबादने बाजी मारत मयंकला आपल्या संघात जोडले. मयंकला 20 लाखांच्या मूळ किंमतीपेक्षा जास्त 1.60 कोटी रुपये जास्त मिळाले.
And…..
Mayank Dagar is SOLD to Sunrisers Hyderabad for INR 1.8 Crore #TATAIPLAuction | @TataCompanies
— IndianPremierLeague (@IPL) December 23, 2022
कशी आहे मयंकची कारकीर्द
मयंक डागर याच्या कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत 28 प्रथम श्रेणी, 47 अ दर्जाचे आमि 44 टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये प्रथम श्रेणीत त्याने 85, अ दर्जाच्या सामन्यात 53 आणि टी20त 44 विकेट्स घेण्याची कमाल केली आहे. मयंकने त्याच्या टी20 कारकीर्दीत 6.17च्या शानदार इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली आहे. विशेष म्हणजे, मयंकला यापूर्वी आयपीएलमध्ये पंजाब किंग्सनेही खरेदी केले होते. मात्र, त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मयंक गोलंदाजीसोबतच फलंदाजीतही दम दाखवू शकतो. आता अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे की, तो या हंगामात आयपीएल पदार्पण करू शकतो. (virender sehwagh nephew mayank dagar ipl 2023 auction srh bought him)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वडिलांनी आयुष्यभर रिक्षा चालवली, पण पोराने मात्र एक आयपीएल लिलावात कमावले 5.50 कोटी
आयपीएल 2023च्या लिलावात मनीष पांडेवर लखनऊने केली पैशांची उधळण, बेस प्राईजपेक्षा दुप्पट रक्कम खिशात