---Advertisement---

चेतन सकारियाच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर भारतीय दिग्गजाचं भावनिक ट्विट; म्हणाले, ‘भावाच्या आत्महत्येची..’

On: मंगळवार, एप्रिल 13, 2021 12:21 PM
---Advertisement---

पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये सोमवारी (१२ एप्रिल) अटीतटीचा सामना पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने बाजी मारत राजस्थान रॉयल्स संघावर ४ धावांनी विजय मिळवला आहे. यंदाच्या हंगामात राजस्थान रॉयल्स संघाचे कर्णधारपद युवा संजू सॅमसनला देण्यात आले आहे. तसेच या सामन्यात युवा खेळाडू चेतन सकरीया याला संधी देण्यात आली होती. या संधीचे सोने करत त्याने राजस्थान रॉयल्स संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केली. या सामन्यानंतर माजी भारतीय क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने एक भावनिक ट्विट शेअर केले आहे.

या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. जोफ्रा आर्चरसारख्या अनुभवी गोलंदाजाच्या अनुपस्थितीत पावरप्लेतील षटक टाकण्याची जबाबदारी संजू सॅमसनने, युवा चेतन सकारीया याला दिली होती. सकारीयाने आपल्या पहिल्याच सामन्यात ४ षटक गोलंदाजी करत ३१ धावा खर्च केल्या. यात त्याने ३ गडी बाद केले. यासोबतच त्याने निकोलस पुरणचा अविश्वसनीय झेल देखील टिपला. या कामगिरीनंतर सर्वत्रच त्याचे कौतुक केले जात आहे.

या सामन्यानंतर माजी भारतीय क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने भावनिक ट्विट केले आहे. त्याने चेतन सकारियाच्या आईची एक मुलाखत शेअर करत लिहिले की, “चेतन सकारियाच्या भावाने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. त्याच्या कुटुंबीयांनी ही गोष्ट त्याच्यापासून लपवून ठेवली होती. कारण तो सैयद मुश्ताक अली स्पर्धेत खेळते होता. यावरूनच कळून येते की, क्रिकेट या युवा खेळाडूंसाठी आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी किती महत्वाचे आहे. खरच आयपीएल या खेळाडूंचे स्वप्न पूर्ण करत आहे. काही गोष्टी तर खूप असाधारण आहेत. चेतनच्या आईने एका मुलाखतीत सांगितले होते की, चेतन इथपर्यंत पोहोचण्यासाठी किती कष्ट घेतले आहेत.”

https://twitter.com/virendersehwag/status/1381677982947758080?s=20

देशांतर्गत होणाऱ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये सौराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चेतनला, राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात १.२० कोटी खर्च करत आपल्या संघात स्थान दिले आहे. या हंगामात राजस्थान रॉयल्स संघाला चेतनकडून आणखी चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

संजूला स्वत:वर विश्वास असल्याने त्याने जोखीम घेतली; ‘त्या’ विवादीत निर्णयाबद्दल संगाकाराचे मोठे भाष्य

अंतिम षटकात संजू सॅमसनची ‘ती’ चूक भोवली, पंजाबची अवघ्या ४ धावांनी राजस्थानवर मात

मोठ्या मनाचा कर्णधार! स्वत:ला नव्हे तर ‘या’ २ खेळाडूंना दिले पंजाब किंग्जच्या विजयाचे श्रेय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---