---Advertisement---

‘जुनं ते सोनं, उगाचचं मिश्रा आयपीएलचा दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज नाही,’ माजी विस्फोटक फलंदाजाने केली स्तुती

On: बुधवार, एप्रिल 21, 2021 10:47 AM
---Advertisement---

एमए चिदंबरम स्टेडियमवर मंगळवारी (२० एप्रिल) पार पडलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघ आमने सामने होते. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने मुंबई इंडियन्स संघावर ६ गडी राखून विजय मिळवला. आयपीएल २०२१ स्पर्धेतील हा दिल्ली कॅपिटल्स संघाचा तिसरा विजय आहे. या सामन्यात गोलंदाजीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अमित मिश्रावर माजी भारतीय फलंदाज फिदा झाला आहे. त्याने ट्विट करत अमित मिश्राचे कौतुक केले आहे.

या सामन्यात मुंबई संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय दिल्ली संघाचा अनुभवी गोलंदाज अमित मिश्रा याने चुकीचा ठरवला. त्याने चार षटक गोलंदाजी करत ६ च्या इकॉनॉमीने अवघ्या २४ धावा देत चार गडी बाद केले होते. या प्रदर्शनाच्या जोरावर मुंबई संघाला धावांचा डोंगर उभारता आला नाही.

तसेच हा सामना दिल्ली संघाने जिंकल्यानंतर माजी भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवागने ट्विट करत म्हटले की, “जुनं ते सोनं. अमित मिश्राने त्याच्या अद्भुत गोलंदाजीने सिद्ध केले आहे की, तो आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज का आहे.”

लेग स्पिनर अमित मिश्रा याने गेल्या काही वर्षांपासून आयपीएल स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तो आयपीएल इतिहासात सर्वाधिक गडी बाद करण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून ते आतापर्यंत खेळलेल्या १५२ सामन्यात तब्बल १६४ गडी बाद केले आहेत. यात १७ धावा देऊन ५ गडी बाद करणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने आतापर्यंत डेक्कन चार्जर्स, दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

तसेच या यादीत अव्वलस्थानी मुंबई इंडियन्स संघाचा गोलंदाज लसिथ मलिंगा आहे. मलिंगाने अवघ्या १२२ सामन्यात १७० गडी बाद केले आहेत. यात १३ धावा देत ५ गडी बाद करणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

दिल्ली संघाने ६ गडी राखून मिळवला विजय
या  सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना १३७ धावा केल्या होत्या. यात रोहित शर्माने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली होती.तसेच ईशान किशनने २६ आणि सूर्यकुमार यादवने २४ धावांचे योगदान दिले होते.या धावांचा पाठलाग करताना, दिल्ली कॅपिटल्स संघाकडून शिखर धवनने सर्वाधिक ४५ धावांची तुफानी खेळी केली होती. तसेच स्टीव्ह स्मिथने देखील ३३ धावांचे योगदान दिले होतें. शेवटी ललित यादवने नाबाद २२ आणि शिमरन हेटमायरने नाबाद १३ धावा करत हा सामना दिल्ली कॅपिटल्स संघाला ६ गडी राखून जिंकून दिला.

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! महेंद्र सिंह धोनीच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

हे पोरगं भारीय! नाणेफेकीवेळी रिषभने रोहितला केल्या गुदगुल्या; Video पाहून व्हाल लोटपोट

हा तर विराटच्याही पुढचा निघाला! रिषभ पंतच्या ‘त्या’ कृत्यावर चाहत्यांच्या उमटल्या भन्नाट प्रतिक्रीया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---