सध्या भारतातील प्रमुख शहरांमध्ये आयपीएल 2023 चा सोळावा हंगाम खेळला जात आहे. या हंगामात राजस्थान रॉयल्स व लखनऊ सुपरजायंट्स हे संघ पहिल्या दोन क्रमांकावर काबीज आहेत. राजस्थानचे नेतृत्व संजू सॅमसन करत असून, लखनऊची धुरा केएल राहुल याच्या खांद्यावर असलेली दिसते. कर्णधार म्हणून दोघे स्वतःला सिद्ध करत असले तरी, फलंदाज म्हणून त्यांच्या प्रतिमेवर कोणीही शंका उपस्थित करत नाही. त्याचवेळी आगामी काळात भारतीय संघात या दोघांपैकी फलंदाज म्हणून कोण योग्य आहे? असा प्रश्न विचारला असता, भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने राहुलचे नाव घेतले.
सेहवाग आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखला जातो. सध्या आयपीएल दरम्यान तो समालोचकाची भूमिका पार पाडत असून, नुकतेच त्याने राहुल की सॅमसन या प्रश्नावर आपले मत व्यक्त केले. सेहवाग म्हणाला,
“दोघेही चांगले फलंदाज आहेत यात कोणतीही शंका नाही. मात्र, ज्यावेळी भारतीय संघात खेळण्याचा प्रसंग येईल त्यावेळी मी राहुल याला पुढे करेल. राहुल भरपूर अनुभवी असून त्याने भारतासाठी कसोटी खेळताना शतके झळकावली आहेत. वनडेमध्ये तो सलामीवीर आणि फिनिशर अशा दोन्ही भूमिका पार पाडतो. टी20 क्रिकेटमध्ये देखील त्याने स्वतःला सिद्ध केले आहे.”
राहुल हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मागील काही काळापासून सातत्याने अपयशी ठरत तीनही प्रकारच्या क्रिकेट संघात त्याची कामगिरी चांगली झाली नाही. याचमुळे त्याच्याकडून कसोटी संघाचे उपकर्णधारपद देखील काढून घेण्यात आले. दुसरीकडे, संजू याला वारंवार संधी मिळाली नाही. वनडे क्रिकेटमध्ये त्याने आपली छाप पाडताना चांगल्या सरासरीने धावा कुटल्या आहेत.
(Virendra Sehwag Said KL Rahul Better Option Than Sanju Samson In Team India)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लखनऊविरुद्धच्या सामन्यापूर्वीच चहलचा मोठा खुलासा! म्हणाला, आम्ही ‘या’ नियमाचा सर्वाधिक फायदा उचलला
अखेर 14 वर्षांचा वनवास संपला! अर्जुनने घडवून आणली क्रिकेट इतिहासातील अतिदुर्मिळ घटना