भारतीय संघ जेव्हा ऑस्ट्रेलिया दौर्यावर पोहोचला होता, तेव्हा सर्व क्रिकेटतज्ञ भारतीय गोलंदाजी सर्वोत्कृष्ट असल्याचे सांगत होते. बुमराह, शमी आणि नवदीप सैनी यांचा समावेश असलेली गोलंदाजी, ऑस्ट्रेलियन संघावर वर्चस्व गाजवेल असा अंदाज वर्तविला होता. मात्र, वनडे मालिका सुरू झाली आणि सर्वांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले. वनडे मालिकेतील दोन्ही सामने गोलंदाजांमुळे भारतीय संघाला गमवावे लागले आणि मालिकादेखील हातातून निसटली. मालिका गमावल्यानंतर आता भारतीय गोलंदाजांवर अनेक प्रश्न उपस्थित होत असून माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने देखील भारतीय गोलंदाजांवर टीका केली आहे.
सेहवागने केली खरमरीत टीका
भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेदरम्यान समालोचन करत असलेला वीरेंद्र सेहवाग भारतीय गोलंदाजांच्या खराब कामगिरीवर अत्यंत निराश दिसला. सेहवाग समालोचनादरम्यान म्हणाला, “भारतीय गोलंदाज ज्याप्रकारे गोलंदाजी करीत आहेत, ते पाहता तिसर्या वनडेमध्ये ऑस्ट्रेलिया संघ नक्कीच ४०० धावा फटकावताना दिसेल. ३९० धावांचे लक्ष्य फक्त भारतीय गोलंदाजांविरूद्धच पार केले जाऊ शकते. ऑस्ट्रेलियन गोलंदाजी खूप मजबूत असून ते धावांचा बचाव करण्यासाठी ओळखले जातात.”
भारतीय गोलंदाजांनी केलाय स्वैर मारा
सेहवागसह इतर समीक्षकदेखील भारतीय गोलंदाजांवर नाराज आहे. पहिल्या आणि दुसर्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी बऱ्याच धावा लुटवलेल्या दिसून येतात. भारताचा प्रमुख गोलंदाज असलेला जसप्रीत बुमराह दोन सामन्यात फक्त एक गडी बाद करू शकला. दुसरीकडे, अनुभवी मोहम्मद शमीला देखील धावा रोखण्यात अपयश आले. नवोदित नवदीप सैनी अपेक्षांवर खरा उतरू शकला नाही. पहिल्या दोन सामन्यात संधी दिला गेलेला फिरकीपटू युझवेंद्र चहल याने खोर्याने धावा दिल्या आहेत. दोन सामन्यात मिळून त्याच्या गोलंदाजीवर १६० धावा बनवल्या गेलेल्या दिसून येतात. हे सर्व खेळाडू आयपीएलमध्ये कमालीच्या फॉर्ममध्ये होते. मात्र, ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर त्यांचा फॉर्म गायब झालेला आहे.
दुसऱ्या वनडेतही भारतीय संघाला करावा लागला पराभवाचा सामना
पहिल्या सामन्यात ६६ धावांनी पराभूत झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघ अपयशी ठरला. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करत ३८९ धावांचा डोंगर रचला. प्रत्युत्तरात भारतीय ३३८ धावांवर बाद झाला. या पराभवासह भारताने तीन सामन्यांची मालिका गमावली आहे. मालिकेतील अखेरचा सामना कॅनबरा येथे २ डिसेंबर रोजी खेळवला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
अफलातून ! हेन्रीक्सने विराटचा घेतला जबरदस्त झेल, पाहा व्हिडिओ
IND vs AUS : प्रेमासाठी काय पण! भावाने चालू सामन्यात तरूणीला केलं प्रपोज, पाहा तिची प्रतिक्रिया
अय्यरच्या रॉकेट थ्रो पुढे धडाकेबाज वॉर्नर गारद; Video जोरदार व्हायरल
ट्रेंडिंग लेख-
बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचे टी२० क्रिकेटमधील सर्वात मोठे तीन विजय
पाच नाही; सहा नाही, तब्बल १० देशांत कसोटी शतके करणारे जगातील २ फलंदाज
भारताने ९८८ वनडे सामने खेळले, पण ‘असा’ नकोसा विक्रम पहिल्यांदाच झाला






