भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग हा आपल्या फटकळ भाषेसाठी अनेकदा ओळखला जातो. तो अगदी कोणतीही भीडभाड न ठेवता तो व्यक्त होत असतो. नुकतेच एका मुलाखतीत बोलताना त्याने भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांच्या कार्यकाळात घडलेल्या काही घटनांचे खुलासे केले. यामध्ये त्याने आपल्याला भारतीय संघाचे कर्णधारपद देण्यात येणार होते असा देखील गौप्यस्फोट केला.
चॅपेल यांच्या कार्यकाळात भारतीय संघात दुफळी माजली होती. तत्कालीन भारतीय कर्णधार सौरव गांगुली याला संघाबाहेर देखील करण्यात आलेले. तसेच भारतीय संघाची 2007 वनडे विश्वचषकाच्या साखळी फेरीतूनच घरवापसी झालेली. या कार्यकाळात सेहवाग भारतीय संघाचा सदस्य होता. त्यावेळेचे अनुभव सांगताना तो म्हणाला,
“वरिष्ठ खेळाडूंनी भारतीय प्रशिक्षकांसोबत बराच वेळ घालवला होता आणि त्यांचे स्वतःचे आवडते खेळाडू होते. ते आपल्या आवडत्या खेळाडूंना पसंती देत असत. परदेशी प्रशिक्षक आला तर तो सर्वांना समानतेने पाहील, असे खेळाडूंना वाटायचे. मात्र, ही धारणा चुकची ठरली. कारण परदेशी प्रशिक्षकाचेही आवडते खेळाडू होते.”
आपल्याला कर्णधारपद देण्याच्या मुद्द्यावर बोलताना तो म्हणाला,
“ज्यावेळी चॅपेल संघाशी जोडले गेले तेव्हा ते म्हणाले होते की संघाचा पुढचा कर्णधार सेहवाग असेल. मात्र, कर्णधारपद सोडा मी काही दिवसात संघातून बाहेर झालो होतो.”
चॅपेल यांच्यावर सचिन तेंडुलकरपासून अनेक भारतीय दिग्गज खेळाडू टीका करताना दिसतात. त्यांच्या कार्यकाळात भारतीय संघ दहा वर्ष मागे गेला असे या खेळाडूंनी म्हटले होते. चॅपेल यांनी जॉन राईट यांच्यानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सांभाळले होते.
(Virendra Sehwag Talk About His Captaincy Of Indian Team In Greg Chappell Stint)
महत्वाच्या बातम्या –
BREAKING: बीसीसीआयकडून नव्या निवडसमितीची घोषणा, यांच्या खांद्यावर दिली जबाबदारी
असलं चालणार नाही! बीसीसीआयने दाखवली पीसीबीच्या ‘त्या’ प्रस्तावाला केराची टोपली!