टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. युवा यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन आणि केएल राहुल या दोघांना १५ जणांच्या संघात स्थान मिळाले आहे. आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. दरम्यान, संघाचा माजी आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवागने टी२० विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघाबद्दल भाष्य केले आहे.
तो म्हणाला की, जर देवदत्त पडिकलने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली तर, त्याला ईशान आणि राहुलऐवजी विश्वचषक संघात स्थान देईन. १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान यूएई आणि ओमानमध्ये विश्वचषकाचे सामने होणार आहेत. सेहवाग म्हणाला की, केएल राहुल, इशान किशन, देवदत्त पडिक्कल आणि संजू सॅमसन यांच्यावर आयपीएलमध्ये सर्वात जास्त नजरा असतील.
तो म्हणाला, ‘ईशान माझी पहिली पसंती आहे. त्यानंतर पडिक्कल, राहुल आणि सॅमसन होते. मी या चौघांची कामगिरी काळजीपूर्वक बघेन. मला देवदत्तची फलंदाजी आवडते. जर मला चारपैकी एकाची निवड करायची असेल, तर मी त्याला संघात स्थान देईन.’ आयपीएल संघ पंजाब किंग्जसोबत काम करणाऱ्या सेहवागने सांगितले की, जर त्याने आरसीबीच्या उर्वरित ७-८ सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली, तर त्याला टी -२० विश्वचषक संघात संधी मिळेल.
वीरेंद्र सेहवाग पुढे म्हणाला की, जर पडिक्कलने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली तर त्याला विश्वचषकासाठी पहिल्या फळीसाठी निवडले जाऊ शकते. पडिक्कलने गेल्या मोसमात आरसीबीसाठी १५ सामन्यांत ४७३ धावा केल्या होत्या. यानंतर, त्याने देशांतर्गत स्पर्धेतही चांगली कामगिरी केली होती. मात्र, श्रीलंकेतील दोन टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यात देवदत्त पडिक्कल केवळ ३८ धावा करू शकला होता.
वीरेंद्र सेहवाग म्हणाला की, ‘सर्व संघांना किमान ७ सामने खेळावे लागतील याचा अर्थ असा की संघांकडे आणि खेळाडूंकडे अजूनही चांगले प्रदर्शन करण्यासाठी एक संधी उपलब्ध आहे. खेळाडू आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करून निवडकर्त्यांना प्रभावित करू शकतात. ते स्पर्धेचे बारकाईने निरीक्षण करतील. आयसीसीच्या नियमांनुसार संघात अजूनही बदल केला जाऊ शकतो.’
महत्त्वाच्या बातम्या –
स्टुअर्ट बिन्नी सुरू करणार नवी कारकीर्द, फोटो शेअर करत दिली माहिती
हैदराबादसाठी करा किंवा मराची स्थिती, राशीद खान म्हणतोय, ‘पुन्हा एकत्र आलोय, आता प्रत्येक सामना…’
न्यूझीलंड संघ २८ वर्षांनंतर लखनऊला खेळणार कसोटी सामना, कारण आहे खास