भारत आणि इंग्लंड यांच्यात ओव्हलवर खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी तेच घडले, ज्याची अनेकांना अपेक्षा होती. डॅनियल जार्विस उर्फ जार्वो पुन्हा एकदा जबरदस्तीने मैदानात शिरला आणि सामन्यात व्यत्यय आणला. सामन्यात व्यत्यय आणण्याची त्याची ही तिसरी वेळ आहे. त्याच्या या कृत्यामुळे जार्वोला पोलिसांनी अटकदेखील केली आहे. माजी भारतीय खेळाडू वीरेंद्र सेहवागने जार्वोच्या या कृतीवर एक मजेदार विधान केले आहे.
सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर समालोचन करताना सेहवागने म्हणाला की, जर पंजाब किंवा दिल्लीमध्ये हीच घटना घडली असती; तर कदाचित या व्यक्तीने पुन्हा मैदानात उतरण्याचा प्रयत्नही केला नसता. काही लोकांना फक्त बळाची भाषा समजते. जर पंजाब पोलिसांची लाठी मिळाली तर तो पुन्हा असे करण्याचा प्रयत्नही करणार नाही.
सेहवाग म्हणाला की, ‘त्याने मोहालीमध्येही एकदा असे कृत्य करावे अशी माझी इच्छा आहे. कारण त्यानंतर तो असे कृत्य कधीही करू शकणार नाही.’ समालोचन करताना सेहवागसोबत माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराही उपस्थित होता. नेहरानेही त्याच्याशी सहमती दाखवत हो म्हटले.
ही घटना इंग्लंडच्या पहिल्या डावात ३४ व्या षटकात घडली, जेव्हा उमेश यादव गोलंदाजी करत होता. जार्वोने यावेळी भारतीय संघाची जर्सी परिधान केली होती आणि तो धावत खेळपट्टीवर गोलंदाजी करण्यासाठी आला होता. यादरम्यान, जार्वोने इंग्लिश फलंदाज जॉनी बेअरस्टोला धक्काही दिला. यामुळे मैदानावरील पंचांना पाच मिनिटे सामना थांबवावा लागला. लंडन पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी जार्वोला अटक केली आहे.
Jarvo with the ball for India this time 🤣🤣 #ENGvINDpic.twitter.com/lZ5HhdvlqW
— CricTracker (@Cricketracker) September 3, 2021
यापूर्वी, इंग्लिश काउंटी यॉर्कशायरने जाहीर केले होते की, हेडिंग्ले मैदानात घुसलेल्या यूट्यूबर डॅनियल जार्विस उर्फ ’जार्वो’ला सुरक्षेचा भंग केल्यामुळे स्टेडियममध्ये प्रवेश करण्यास आजीवन बंदी घालण्यात आली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी जार्वोने पुन्हा खेळ खराब करण्याचा प्रयत्न केला होता. भारताचा सलामीवीर रोहित शर्मा बाद झाल्यानंतर ही घटना घडली होती. यावेळी तो फलंदाजीसाठी मैदानात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
जार्वोच्या एन्ट्रीवर जाफरने ‘हे’ फनी मीम शेअर करत इंग्लंडच्या सुरक्षा यंत्रणेची उडवली खिल्ली
चुकीला माफी नाही! भारत-इंग्लंड सामन्यात सलग तिसऱ्यांदा घुसणाऱ्या जार्वोवर अटकेची कारवाई
जार्वो आला अन् थेट पळत जाऊन बेअरस्टोला धडकला, भारताचा ब्रिटिश चाहता तिसऱ्यांदा घुसला मैदानात