भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळला गेला. पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर मालिकेतील आव्हान कायम राखण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने गोलंदाजीत धमाकेदार कामगिरी केली. मिचेल स्टार्कच्या 5 बळींसह सर्वच वेगवान गोलंदाजांनी बळी मिळवत भारताचा डाव केवळ 117 धावांवर संपवला.
What a bowling performance from Australia! ✨
India are all out for 117! #INDvAUS | 📝 Scorecard: https://t.co/5ISBBNMhiZ pic.twitter.com/bfWB2MMDQE
— ICC (@ICC) March 19, 2023
मुंबई येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने संघर्ष पूर्ण विजय मिळवला होता. त्यानंतर विशाखापट्टणम येथील या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या षटकातील तिसऱ्याच चेंडूवर त्याचा हा निर्णय स्टार्कने योग्य ठरवला. शुबमनला त्याने बाद करत ऑस्ट्रेलियाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर पाचव्या षटकात गोलंदाजीला आल्यानंतर त्याने कर्णधार रोहित शर्मा याला देखील तंबूचा रस्ता दाखवला. पुढच्या चेंडूवर त्याने सूर्यकुमार यादव याला पायचित करत भारताला संकटात ढकलले.
पहिल्या सामन्यात नाबाद अर्धशतक करणारा केल राहुल देखील 9 धावांच्या पुढे जाऊ शकला नाही. तर, हार्दिक पंड्या देखील केवळ एका धावेवर बाद झाला. त्यावेळी भारतीय संघाची अवस्था 5 बाद 49 अशी होती. विराट कोहली व रवींद्र जडेजा भारतीय संघाचा डाव सावरत असताना नॅथन एलिसने दोघांनाही बाद केले. त्यांनी अनुक्रमे 31 व 16 धावा केल्या. ऍबॉटने कुलदीप यादव व मोहम्मद शमी यांना बाद करत भारतीय संघाचे 9 फलंदाज तंबूत पाठवले. अखेर स्टार्कने सिराजचा त्रिफळा उडवून आपले पाच बळी पूर्ण करत भारताचा डाव संपवला. भारतासाठी अक्षर पटेलने नाबाद 29 धावा केल्या. ऍबॉटने 3 व एलिसने 2 बळी मिळवत स्टार्कला साथ दिली.
(Vizag ODI India All Out On 117 Mitchell Starc Took Fifer)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विशाखापट्टणममध्ये मोठी कामगिरी करणार स्टीव स्मिथ? भारताविरुद्ध मोडणार दिग्गजाचा विक्रम
WPL 2023 । एलिस पेरीकडून स्मृती मंधानाचे कौतुक, जाणून घ्या ऑस्ट्रेलियन अष्टपैलूला काय भावले