---Advertisement---

‘या’ युवा खेळाडूंनी शानदार प्रदर्शनाने जिंकले भारतीय दिग्गजाचे मन, दिली टी२० विश्वचषक संघात जागा

On: शनिवार, मार्च 27, 2021 7:44 AM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाकडून पदार्पण करणार्‍या ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी आपल्या खेळीने सर्व क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्याचबरोबर आता त्यांनी भारताचे माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यावरती देखील आपल्या खेळाची छाप पाडली आहे.

लक्ष्मण यांचा असा विश्वास आहे की, या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या आयसीसी टी-20 विश्वचषकात ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांना भारतीय संघात स्थान मिळू शकते. 22 वर्षीय ईशान किशन आणि 30 वर्षीय सूर्यकुमार यादव यांनी इंग्लडविरूद्धच्या टी -20 मालिकेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ईशानने इंग्लंडविरुद्ध 32 चेंडूत 56 धावा केल्या; तर सूर्यकुमारने चौथ्या आणि पाचव्या टी-20 सामन्यात अनुक्रमे 31 चेंडूंत 57 आणि 17 चेंडूत 32 धावा केल्या.

स्टार स्पोर्ट्सच्या ‘क्रिकेट कनेक्टेड’ कार्यक्रमामध्ये बोलताना लक्ष्मण म्हणाले की, “हा एक अतिशय कठीण असा प्रश्न आहे. कारण आपण पाहिले आहे की या मालिकेत बर्‍याच तरुणांनी संधीचा पुरेपूर फायदा घेतलाआहे. परंतु ईशान आणि सूर्यकुमारने आपल्या पदार्पण डावात ज्या पद्धतीने खेळी केली ती बघून मी त्यांना माझ्या 15 खेळाडूंच्या टी२० विश्वचषक संघात स्थान दिले आहे.”

भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी असे म्हटले आहे की, “टी-20 विश्वचषकास अजून बराच कालावधी आहे. तत्पुर्वी आयपीएल होणार आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या अनेक खेळाडूंना संघात स्थान मिळू शकते. त्यानंतर

भुवनेश्वर कुमार या संघात असेल का? असे विचारले असता बांगर यांनी “नक्कीच असेल कारण तो तंदुरुस्त असून फॉर्ममध्येही आहे.” असे उत्तर दिले.

महत्त्वाच्या बातम्या-

नाद करायचा नाही! वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा २० पेक्षा अधिक षटकार ठोकणारे संघ, भारताचा तर उल्लेखही नाही

कोलकाता नाइट रायडर्ससाठी आनंदची बातमी; ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ खेळाडूचे लवकरच होणार भारतात आगमन

धू धू धुतलं! स्टोक्सने ५२ चेंडूत ठोकले १० खणखणीत षटकार, ‘या’ फलंदाजांची केली बरोबरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---