---Advertisement---

विश्वचषक जिंकायचाय तर ‘या’ तिघांना द्या टीम इंडियात स्थान, लक्ष्मण दिला बहुमोल सल्ला

On: बुधवार, नोव्हेंबर 18, 2020 4:18 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियात २०२०मध्ये होणारा टी-20 विश्वचषक २०२२मध्ये ऑस्ट्रेलियातच होणार आहे तर ऑक्टोबर 2021 मध्ये भारतातही टी२० विश्वचषक ठरल्याप्रमाणे होणार आहे. विश्वचषक भारतात होणार असल्याने टीम इंडियाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या विश्वचषकात भारतीय गोलंदाजांवर संघाच्या विजेतेपदाचे स्वप्न अवलंबून असणार आहे. अशावेळी शेवटच्या षटकांत गोलंदाजी करणाऱ्या उत्तम गोलंदाजांची टीम इंडियाला गरज पडणार आहे. याचसाठी भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने तीन गोलंदाजांची नावे सुचवली आहेत.

“पुढील वर्षी टी -२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. जर तुम्ही भारतीय संघाकडे विजयाचे दावेदार म्हणून पाहात असला तर चांगले गोलंदाज अंतिम षटकांत गोलंदाजी करण्यासाठी असणे संघाला आवश्यक आहे. मोहम्मद शमी आणि नवदीप सैनी हे अंतिम षटकांत मोठ्या आत्मविश्वासाने उत्तम गोलंदाजी करतात. टी नटराजन हा डावखुरा गोलंदाज असल्याने त्याचा एक्स फॅक्टर म्हणून टीम इंडियात उपयोग होईल,” असे लक्ष्मण म्हणाला आहे.

व्हीव्हीएस लक्ष्मणला नटराजनवर आहे विश्वास
नटराजनने आयपीएल स्पर्धेत आपल्या डावखुऱ्या गोलंदाजीने उत्तम कामगिरी केली आहे. त्याने विराट कोहली आणि एबी डी व्हिलीयर्सला देखील बाद केले होते. त्याने टाकलेल्या यॉर्कर सर्वांना आकर्षित केले आहे.

“नटराजन त्याच्या यॉर्करसाठी नेहमीच परिचित आहे. अगदी तेलंगणा प्रीमियर लीग पासून मी त्याला पाहिले आहे. परंतू त्याने आयपीएलमध्ये तसा परिपूर्ण खेळ केलेला नाही. त्याच्याकडे बाऊन्सर, स्लॉवर वन, ऑफ-कटर असे वैविध्य असून नवीन चेंडूसह विकेट घेण्याची त्याच्यात क्षमता आहे,” असेही नटराजनबद्दल बोलताना लक्ष्मण म्हणाला.

टी-20 विश्वचषकासाठी आहे बराच अवकाश
ऑक्टोबर 2021 मध्ये भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी अजून बराच अवकाश असून त्यापूर्वी मायदेशाबरोबर परदेशातही अनेक मालिका खेळणार आहे. त्यात टी२०, वनडे व कसोटी मालिकांचाही समावेश आहे. तसेच टी२० विश्वचषकापुर्वी एक आयपीएल स्पर्धा होणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटपटूंना स्वत:ला सिद्ध करण्याची मोठी संधी मिळणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---