भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीमध्ये तो ११ व्या क्रमांकावर आहे. परंतु २०२१ मध्ये त्याला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. त्याने यावर्षी ४ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याला अवघे ७ गडी बाद करता आले आहेत. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात देखील त्याला बळी मिळवण्यात अपयश आले आहे. अशातच माजी भारतीय क्रिकेटपटू व्हिव्हिएस लक्ष्मण यांनी त्याच्या गोलंदाजीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
कसोटी अजिंक्यपद सामन्यातील कामगिरीविषयी लक्ष्मण यांनी म्हटले की, “जसप्रीत बुमराहने सुरुवातीला खूप कमी फुल चेंडूंचा मारा केला. इंग्लंडमध्ये चेंडू स्विंग करण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी चेंडू पुढे टाकणे आवश्यक आहे. परंतु सुरुवातीला अपयश येऊन देखील त्याने आपल्या गोलंदाजीमध्ये बदल केला नाही.”
जसप्रीत बुमराहची २०२१ वर्षातील कामगिरी पाहिली तर त्याने आतापर्यंत एकूण ४ कसोटी सामन्यातील ६ डावात १०५.४ षटक गोलंदाजी केली आहे. यामध्ये त्याला अवघे ७ गडी बाद करण्यात यश आले आहे. तसेच ८४ धावा खर्च करत ३ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून ही त्याची सर्वात निराशाजनक कामगिरी आहे.
त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील अवघ्या पाचव्या डावात पाच गडी बाद करण्याचा कारनामा केला होता. परंतु २०२१ मध्ये तो पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. (vvs laxman raised questions on jasprit bumrah bowling
जसप्रीत बुमराहने अश्विनचे केले होते कौतुक
नुकतेच स्वत: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने संघ सहकारी आणि फिरकीपटू आर अश्विनची स्तुती केली होती. आयसीसीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये त्याने म्हटले होते की, “मला असे वाटते की, तो या खेळातील दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे. तुम्ही त्याची कामगिरी पाहिली तर तुम्हाला अंदाज येईलच. त्याने गोलंदाजीसह फलंदाजीमध्ये ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये ४०० गडी बाद करण्याचा विक्रम आहे आणि हे सहज होत नाही.”
महत्वाच्या बातम्या-
WTC फायनल: पावसामुळे २ दिवस वाया गेल्यानंतर आयसीसीकडून दर्शकांना ‘मोठा दिलासा’
पावसामुळे कसोटी चॅम्पियनशीप फायनल ड्रॉ झाली तर कोण असेल विजेता? घ्या जाणून
नक्की झाले काय? विराट कोहली आणि दिनेश कार्तिकचा ‘तो’ व्हिडिओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न