न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज केएस भरतला राखीव यष्टीरक्षक म्हणून खेळण्याची संधी मिळाली. वृद्धिमान सहा त्याच्या मानेच्या दुखापतीमुळे तो सामन्याच्या तिसऱ्या आणि पाचव्या दिवशी मैदानाबाहेर बसला आणि भरतला त्याच्या जागी यष्टीरक्षण करण्याची संधी मिळाली. अशातच भारतीय संघाचे दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी यापूर्वी केएस भरत विषयी केलेल्या भविष्यवाणीविषयी खुलासा केला आहे. लक्ष्मणने सांगितल्यानुसार द्रविड भरतच्या यष्टीरक्षणाच्या शैलीमुळे आधीपासूनच प्रभवित होता.
लक्ष्मणने सांगितल्यानुसार सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड भरतच्या यष्टीरक्षणाच्या शैलीविषयी बोलले होते. द्रविड म्हणालेला की, भारतीय क्रिकेटमध्ये केवळ वृद्धिमान सहानंतर भरत सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक आहे. स्टार स्पोर्ट्सवर बोलताना लक्ष्मणने या आठवणींना उजाळा दिला आहे, जेव्हा त्यांनी द्रविडसोबत भरतच्या यष्टीरक्षणाच्या शैलीविषयी चर्चा केली होती.
लक्ष्मणने यावेळी कसोटी क्रिकेटमध्ये चांगल्या यष्टीरक्षकाचे महत्त्व देखील सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, चांगला यष्टीरक्षक असल्यामुळे खूप फायदा मिळतो. लक्ष्मण भरतचे प्रदर्शन पाहून प्रभावित झाल्याचे पाहायला मिळत आहे. लक्ष्मण यावेळी बोलताना म्हणाला की, चांगले फिरकी गोलंदाज असून देखील, जर तुमच्याकडे एक विश्वसनीय यष्टीरक्षक नसेल, तर तुम्ही खूप साऱ्या संधी गमावू शकता.
भरतच्या सामन्यातील प्रदर्शनाविषयी बोलताना लक्ष्मण म्हणाला की, आज आपण जे पाहिले ती, उत्कृष्ट शैली आणि माइंड ऑफ प्रेजेंसचे अप्रतिम नमुना होता. तो त्याच्या परिस्थितीमुळे घाबरला नाही.
न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात मिळालेल्या संधीनंतर त्याला सुरुवातील थोडा अडथळा आल्यासारखे वाटले, पण नंतर त्याने त्याची यष्टरक्षणाच्या जोरावर चाहत्यांची मने जिंकली. सामन्यादरम्यान भरतने कर्णधार अजिंक्य रहाणेला एक महत्त्वाचा रिव्ह्यू घेण्यासाठी मदत केली आणि या रिव्ह्यूमुळे संघाला न्यूझीलंडचा सलामीवीर विल यंगची विकेट मिळाली.
दरम्यान, भारताने पहिल्या डावात ३४५ धावा केल्या. प्रत्युत्तरा न्यूझीलंड संघ पहिल्या डावात २९६ धावांचा टप्पा गाठू शकला. पहिला डाव संपल्यानंतर भारत ४९ धावांनी आघाडीवर होता. दुसरा डाव भारताने २३४ धावांवर घोषित केला आणि न्यूझीलंडसमोर विजयासाठी २८३ धावांचे आव्हान ठेवले. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने १ बाद ४ धावा केल्या.
दरम्यान भरतला जेव्हा सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पहिल्यांदा खेळण्याची संधी मिळाली, तेव्हा सामना सुरू होण्याच्या अवघ्या बारा मिनिटापूर्वी त्याला ही गोष्ट सांगितली गेली होती. त्याने मिळालेल्या या अवघ्या १२ मिनिटात स्वतःला खेळण्यासाठी तयार केले.
महत्त्वाच्या बातम्या –
एकमेवाद्वितीय! तब्बल ११ देशात कसोटी शतक करणारा एकमेव क्रिकेटर