आयपीएल २०२२ स्पर्धेची रिटेन प्रक्रिया मंगळवारी (३० नोव्हेंबर) पार पडली. या रिटेन प्रक्रियेत जुन्या ८ संघांनी २७ खेळाडूंना रिटेन केले. यामध्ये काही युवा खेळाडूंचा सहभाग आहे, तर काही दिग्गज खेळाडू देखील आहेत ज्यांना रिलीज करण्यात आले आहे. या खेळाडूंना अहमदाबाद किंवा लखनऊ संघ आपल्या संघात स्थान देऊ शकतो, तर काही खेळाडू मेगा लिलावात दिसतील. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आगामी आयपीएल स्पर्धेसाठी विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज यांना रिटेन केले आहे. याच संघातील एका गोलंदाजाला रिलीज केले होते, जो आता अप्रतिम कामगिरी करून सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
अबू धाबीमध्ये टी१० लीग स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत रोज काही ना काही असे घडत असते. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतो. अशातच एका सामन्यात वनिंदू हसरंगाने अवघ्या १० चेंडूंमध्ये ५ गडी बाद करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. इतकेच नव्हे तर त्याने गोलंदाजी करताना अवघ्या ८ धावा खर्च केल्या.
पहिल्या २ चेंडूंवर त्याला गडी बाद करता आला नव्हता. त्याने या संपूर्ण स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. आतापर्यंत त्याला एकूण १८ गडी बाद करण्यात यश आले आहे. वनिंदू हसरंगाला आयपीएल २०२१ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात स्थान देण्यात आले होते. परंतु त्याला रिटेन करण्यात आले नाहीये.
या स्पर्धेत डेक्कन ग्लेडीएटर्स संघाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या वनिंदू हसरंगाने पहिल्या २ चेंडूंवर ६ धावा खर्च केल्या होत्या. बंगला टायगर्स संघाचा फलंदाज करीम जन्नत याला पहिल्या चेंडूवर एकही धाव काढता आली नाही. त्यानंतर पुढील चेंडूवर त्याने षटकार मारला. त्यानंतर वनिंदू हसरंगाने जोरदार पुनरागमन करत तिसऱ्या चेंडूवर करीम जन्नतला आणि चौथ्या चेंडूवर जॉनसन चार्ल्सला बाद केले. शेवटच्या २ चेंडूंवर फक्त २ धावा झाल्या. अशाप्रकारे त्याने पहिल्या षटकात ८ धावा खर्च केल्या.
दुसऱ्या षटकात पटकावले ३ बळी
दुसऱ्या षटकात देखील वनिंदू हसरंगाने अप्रतिम गोलंदाजी सुरू ठेवली होती. त्याने दुसऱ्या षटकात एकही धाव खर्च केली नाही आणि ३ फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. दोन्ही षटकात त्याला हॅटट्रिक घेण्याची संधी होती. परंतु तो हॅटट्रिक पूर्ण करू शकला नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
कसोटी क्रमवारी: श्रेयस अय्यरची पदार्पणातच मोठी उडी, शाहिन आफ्रीदीही टॉप ५ मध्ये
Photo: केएल राहुलच होणार शेट्टी कुटुंबाचा जावई? अथियासोबतची रेड कार्पेटवरील एन्ट्री ठरतेय लक्षवेधी