मुंबई । भारताचा माजी कर्णधार आणि अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने 2019 विश्वचषकातील न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यानंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. तो पुनरागमन करेल की नाही यावर क्रिकेट वर्तुळात सातत्याने चर्चा सुरू आहे.
तो आयपीएल 2020 मधून पुनरागमन करणार होता, पण कोरोना व्हायरसमुळे या स्पर्धा स्थगित करण्यात आल्या. त्यामुळे त्याचे पुनरागमन लांबले.
दरम्यान, भारताचा वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतच्या मते, एमएस धोनी टी 20 विश्वचषक खेळावे. त्यानंतर सर्व खेळाडू त्याला खांद्यावर घेऊन सचिन तेंडुलकर सारखे मैदानवर फिरवतील. धोनीने भारतीय क्रिकेटला खूप काही दिले. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने खूप यश प्राप्त केले. त्याची बरोबरी कोणीच करू शकत नाही.
श्रीसंत क्रिकेट ऍडिक्टरवर बोलताना म्हणाला की, “धोनीने टी 20 विश्वचषक खेळले पाहिजे. मला आशा आहे की, विश्वचषकापूर्वी आयपीएलचे आयोजन होईल. यामध्ये धोनीची स्फोटक खेळी आपणाला पाहता येईल. लोक त्याच्या विषयी खूप बोलत आहेत पण तो शांत आहे. त्याला माहित आहे तो काय करणार आहे.”
श्रीसंत म्हणाला की, धोनीने देशाची सेवा केली. तसेच तो राजकारणात जाणार नाही असे सांगितले आहे. त्याला अधिक सेवा करायची आहे. मला असे वाटत नाही की यावर मी माझे मत व्यक्त करण्यास योग्य आहे.
2011 साली भारताने विश्वचषक जिंकल्यावर सर्व खेळाडूंनी सचिनला खांद्यावर बसवून संपूर्ण मैदानावर आनंदाने फिरवले होते. श्रीसंतला देखील आशा आहे की, टी20 विश्वचषकामध्ये असेच होईल. पण यावेळी सर्व खेळाडू धोनीला आपल्या खांद्यावर बसून आनंद साजरा करतील.
“संपूर्ण निर्णय धोनीला घ्यायचा आहे. एक क्रिकेट फॅन म्हणून मी सचिन पाजीला पाहिले आहे. मला वाटते की, धोनीने पुन्हा क्रिकेट खेळावे आणि हा टी20 विश्वचषक जिंकला पाहिजे”, असेही श्री सनने नमूद केले.”
श्रीसंतला भारतीय संघात पुनरागमन करण्याची आशा आहे. श्रीसंतवर 2013 च्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणी लागलेली बंदी सप्टेंबरमध्ये उठणार आहे. त्यानंतर तो केरळकडून रणजी क्रिकेट खेळताना दिसू शकतो. केरळ क्रिकेट असोसिएशनने असा निर्णय घेतला आहे, की जर श्रीसंतने आपली तंदुरुस्ती सिद्ध केली, तर त्याची निवड रणजी संघात केली जाईल. यासाठी श्रीसंतने सरावाला देखील सुरुवात केली आहे.
ट्रेंडिंग घडामोडी –
‘या’ भारतीय माजी क्रिकेटरची जाऊ शकते नोकरी, बीसीसीआयने सांगितले कारण
लॉकडाऊनमुळे बदलणार टीम इंडियाची जर्सी, १४ वर्षात पहिल्यांदाच होणार ही नकोशी गोष्ट
रोहितचा सराव करणं या लोकांना आवडलं नाही, राज्य सरकारला केली अपिल