भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) संघामध्ये 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. पहिला सामना लीड्समध्ये खेळला गेला. टीम इंडियासाठी या सामन्यात 5 शतके झळकावण्यात आली, तरी देखील भारतीय संघाचा 5 विकेट्सने पराभव झाला. या पराभवाचे मुख्य कारण म्हणजे भारतीय गोलंदाजांचे निराशाजनक प्रदर्शन.
आता पहिल्या पराभवानंतर माजी ऑस्ट्रेलिया कर्णधार मायकल क्लार्कने (Michael Clarke) टीम इंडियाला एक महत्त्वाचा सल्ला दिलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की, भारताला इंग्लंडमध्ये मालिका जिंकायची असेल तर त्यांनी कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील करणे गरजेचे आहे. कुलदीप भारतासाठी संकट मोचक ठरू शकतो.
मायकल क्लार्कने या खेळाडू बद्दल बियॉन्ड 23 पॉडकास्टमध्ये म्हटले की, गोलंदाजीमध्ये कोणत्याही एका खेळाडूवर मी जास्त जोर देण्याचा प्रयत्न करत नाही. पण मला वाटते की, संघाने कुलदीप यादवला खेळवले पाहिजे. मला वाटते की हे सोपे आहे, तो विकेट घेणारा गोलंदाज आहे.
इंग्लंडला कुलदीप विरुद्ध खेळण्यांमध्ये अडचण होईल. कुलदीप त्याच्या खेळाच्या शीर्षस्थानी सध्या आहे, त्यामुळे मालिकेत हा एक निर्णायक क्षण ठरू शकतो. कारण इंग्लंड आक्रमक होणं पसंत करतो आणि जेव्हा तुम्ही आक्रमक होता तेव्हा तुम्ही या गोष्टीचा विचार केला पाहिजे की, चेंडू कोणत्या बाजूला फिरत आहे? जर खेळपट्टी कडून थोडी मदत मिळाली तर कुलदीप सर्व बाजूने गोलंदाजी करण्यात सक्षम होईल.
पहिल्या सामन्यात कुलदीपला संधी मिळाली नाही. टीम इंडियाने (Team India) केवळ एक फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) संधी दिलेली होती. त्याने पहिल्या डावांमध्ये 0 आणि दुसऱ्या डावांमध्ये फक्त 1 विकेट त्याच्या नावावर केली. कदाचित त्यांच्या खराब गोलंदाजी कारणाने भारतीय संघ पहिल्या सामन्यात विजय प्राप्त करू शकला नाही.