---Advertisement---

पाकिस्तानचा प्रशिक्षक खेळाडूंवर भडकला; म्हणाला हे तर धोकेबाज खेळाडू

On: गुरूवार, जुलै 16, 2020 6:03 PM
---Advertisement---

मुंबई । पाकिस्तानचा महान वेगवान गोलंदाज वकार युनूस हा त्याच्या रेिव्हर्स स्विंगसाठी ओळखला जात होता. या महान पाकिस्तानी गोलंदाजाने 789 आंतरराष्ट्रीय बळी घेतले. वकारने 373 कसोटी आणि 416 वनडे विकेट आपल्या नावावर केल्या.

सध्या वकार युनूस हा पाकिस्तानचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे आणि तो संघातील खेळाडूंवर आपले मत देत राहतो. अलीकडेच पाकिस्तानच्या दोन सर्वोत्कृष्ट गोलंदाजांवर वकार यांने प्रश्न उपस्थित केले. वकारने तर त्यांना मिडियासमोर धोकेबाज म्हणाला होता. 

वकार युनूसने पाकिस्तानचे दोन प्रतिभावान गोलंदाज मोहम्मद आमिर आणि वहाब रियाज यांना गद्दार म्हटले होते. आपल्या सडेतोड वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या वकारने या दोन्ही गोलंदाजांवर प्रश्न उपस्थित केले. जेव्हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संघाच्या खराब कामगिरीबद्दल वकार युनूस यांना पत्रकारांनी विचारलेतेव्हा त्यांनी त्याचे खापर मोहम्मद आमिर आणि वहाब रियाजवर फोडले. हे दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलियामध्ये गेले नाहीत, कारण त्यांनी कसोटी क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला होता.”

या निर्णयामुळे पाकिस्तानचे नुकसान झाले आणि ऑस्ट्रेलियामध्ये युवा गोलंदाजांच्या आक्रमणाखाली संघास उतरावे लागले. वकार युनूस म्हणाले, ‘आम्ही ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर  2-3 नवीन गोलंदाज घेतले. सर्वात मोठे कारण म्हणजे शेवटच्या क्षणी आमिर आणि वहाब यांनी आम्हाला धोका दिला. त्याने 15-20 दिवसांपूर्वी कसोटी सामने न खेळण्याचा निर्णय घेतला. मी त्याचबरोबर वहाब रियाझने आपल्या निर्णय पलटला. ते सध्या इंग्लंड दौर्‍यावर संघासमवेत आहेत.’

इंग्लंडमध्ये सामना फिक्सिंगमध्ये मोहम्मद आमिर दोषी आढळला आणि असे असूनही पीसीबीने त्याला आणखी एक संधी दिली. आमिरने चॅम्पियन्स ट्रॉफी 2017  जिंकून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी त्याच्या धक्कादायक निर्णयाने सर्वांनाच चकित केले. मोहम्मद आमिरने पाकिस्तानकडून फक्त 36 कसोटी सामने खेळले आहेत आणि त्याच्या नावावर 119 विकेट्स ची नोंद आहे. 61वनडे सामन्यात त्याने सामन्यात 81 बळी मिळवले आहेत. टी 20 मध्ये त्याने 59 बळी घेतले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---