सध्या जगात कोरोना व्हायरसचा धोका वाढत आहे. त्यामुळे अनेक क्रीडास्पर्धांवर त्याचा परिणाम होत आहे. भारतात होणाऱ्या आयपीएलच्या १३ व्या मोसमाच्या आयोजनावरही प्रश्नचिन्ह आहे. सध्यातरी आयपीएल १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
पण असे असले तरी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर आयपीएलचा १३ वा मोसम खेळण्यासाठी उत्सुक आहे. हा मोसम जर पार पडला तर या मोसमात वॉर्नर खेळताना दिसू शकतो असे वॉर्नरच्या मॅनेजरने स्पष्ट केले आहे.
ऑस्ट्रेलियन सरकारनेही कोणत्याही व्यक्तीला देशाबाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी चौथ्या स्तरावरील प्रवास बंदी जारी केली आहे. पण वॉर्नरचे मॅनेजर जेम्स एर्स्किन म्हणाले की, आयपीएल २०२० झाल्यास सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार असलेला वॉर्नर खेळू शकेल.
द एजने दिलेल्या वृत्तानुसार एर्स्किन म्हणाले, ‘जर आयपीएल झाले तर वॉर्नर खेळण्याचा विचार करत आहे.’
तसेच ते म्हणाले, ‘जर गोष्टी नाटकीयरित्या बदलल्या गेल्या, ज्या की एका तासाभरातही बदलल्या जाऊ शकतात. तर तूमचे मन बदलू शकते. कोणासाठीही हे वेगळे नाही.’
आयपीएलच्या १३ व्या मोसमात ऑस्ट्रेलियाचे १७ खेळाडू सहभागी होणार आहेत. यात वॉर्नरसह, स्टिव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स, असे की स्टार खेळाडू आहेत. सध्यातरी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जर आयपीएल झाले तर त्यात सहभागी व्हायचे की नाही हे ठरवण्याचा निर्णय खेळाडूंवरच सोपवला आहे.
वॉर्नरला सनरायझर्स हैद्राबादने या मोसमासाठी पुन्हा एकदा कर्णधारपद सोपवले आहे. याआधी वॉर्नरच्या नेतृत्वाखाली हैद्राबादने २०१६ ला आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे.
ट्रेडींग घडामोडी –
–रोहितसह हे ४ खेळाडू आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा झिरोवर बाद
–रणजी ट्राॅफीच्या फायनलमधील वाद शिगेला, बंगालच्या संघ या कारणाने वैतागला
–१२ पैकी १२ आयपीएलमध्ये सुरेश रैनाने धावांचा असा पाडला आहे पाऊस
–एकाचवेळी विरासह ७ खेळाडूंनी ट्विट करण्याचे कारणंही आहे तसंच मोठं
–जर आयपीएल झाली नाही तर या ५ खेळाडूंचं होणार सर्वाधिक नुकसान