बीसीसीआयने बुधवारी खेळाडूंसाठी वार्षिक करार सूची जाहीर केली होती. यामध्ये बहुतांश खेळाडूंनी आपापली श्रेणी कायम राखली आहे. तर युवा फलंदाज यशस्वी जैस्वालचा प्रथमच करारसूचीत समावेश करण्यात आला. मात्र सर्वाधिक चर्चा झाली श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांची. शैलीदार फलंदाज म्हणून नावारुपास आलेला श्रेयस अय्यर आणि तडाखेबंद फलंदाज आणि विकेटकीपर इशान किशन यांना या करार यादीतून डच्चू देण्यात आला आहे.
याबरोबरच राष्ट्रीय संघ तसंच प्रथम श्रेणी क्रिकेटमधली प्रतिष्ठेची अशी रणजी करंडक स्पर्धा यामध्ये खेळण्याला प्राधान्य न दिल्याने या दोघांचा वार्षिक करार सूचीसाठी विचार करण्यात आलेला नाही.गेल्या वर्षीच्या करारबद्ध खेळाडूंच्या यादीनुसार श्रेयस ‘ब’ तर इशान ‘क’ श्रेणीत होता. ‘ब’ श्रेणीतील क्रिकेटपटूंना प्रतिवर्षी ३ कोटी तर ‘क’ श्रेणीतील खेळाडूंना प्रतिवर्ष 1 कोटी रुपये मानधन मिळतं. श्रेयस आणि इशानला आता हे मानधन मिळणार नाहीत.
तसेच भारतीय संघातून वगळल्यानंतर श्रेयस अय्यरने कोलकाता नाईट रायडर्सच्या प्री-आयपीएल कॅम्पमध्ये भाग घेतला होता, असा दावा अनेक अहवालांमध्ये करण्यात आला आहे. श्रेयस अय्यर हा कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार आहे. याबरोबरच जेव्हा BCCI चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांना कळले की पाठीच्या समस्येची तक्रार असूनही अय्यर आयपीएल कॅम्पमध्ये भाग घेत आहे तेव्हा ते संतप्त झाले होते.
मात्र, कोलकाता नाईट रायडर्सचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी एमसीएला ही बातमी दिली होती, त्यानंतर मुंबईचे प्रशिक्षक ओंकार साळवी यांनी श्रेयस अय्यरच्या रिकव्हरीची तपासणी करण्यासाठी केकेआर अकादमीला भेट दिली. श्रेयस अय्यरला अजित आगरकर यांच्या नाराजीला सामोरे जावे लागल्याचा दावा अनेक बातम्यांमध्ये करण्यात आला आहे. दरम्यान, आता श्रेयस अय्यर मात्र तामिळनाडूविरुद्धच्या रणजी उपांत्य फेरीत मुंबईकडून खेळत आहे. तर या सामन्याच्या पहिल्या डावात श्रेयस अय्यर 3 धावा करून बाद झाला आहे.
महत्वाच्या बातम्या –
- Indian Team : विश्व क्रिकेटवर भारतीय संघाचं वर्चस्व! प्रत्येक फॉरम्याटमध्ये भारतीय संघ टेबल टॉपर
- WTC Points Table : न्यूझीलंडच्या पराभवाचा भारताला मोठा फायदा, रोहितची सेना बनली टेबल टॉपर