बुधवारी(21 एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग 2021 हंगामात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात सामना झाला. हा सामना चेन्नईने 18 धावांनी जिंकला. मोठ्या धावसंख्येचा झालेल्या या सामन्यात वादळी खेळी पाहायला मिळाल्या. त्यातील एक वादळी खेळी कोलकाताचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसलने केली होती.
या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 220 धावांचा डोंगर उभा केला होता. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या कोलकता संघातील पहिले पाच फलंदाज स्वस्तात बाद झाले. परंतु, त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या आंद्रे रसेलने स्फोटक फलंदाजी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्याने 6 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 22 चेंडूत 54 धावा कुटल्या. तो संघाला सामना जिंकवून देणार असे वाटत असताना गोलंदाजी करीता आलेल्या सॅम करनने त्याला त्रिफळाचीत करत केकेआरला आणखी एक धक्का दिला.
या सामन्यात आंद्रे रसेलने स्फोटक फलंदाजी करत लक्ष्याचा पाठलाग करण्यास सुरूवात केली तेव्हा धोनीने सॅम करनला गोलंदाजी दिली. सॅमनेही रसेलचा बळी मिळवला. त्यानंतर रसेलला बाद करण्यामागे धोनीची काही रणनीती होती का? याबाबत चर्चा सुरू झाली. कारण धोनीचा ज्याप्रकारचा अनुभव आहे, ते पाहून यामागे धोनीची रणनीती असू शकते असा अंदाज बांधला जात होता.
परंतु, सामन्यानंतर धोनीला याबाबत विचारले असता ही योजना माझीच होती असे म्हणणे सोपे असले तरी, ती योजना माझी नव्हती. असे तो म्हणाला. तो म्हणाला “एकदा यशस्वी झाल्यानंतर आपण म्हणू शकतो ही माझीच रणनीती होती. कारण, रसेलने ऑफ साईडच्या चेंडूवरती जोरदार फटके मारले परंतु, लेग साईडच्या चेंडूवरती तो बाद झाल्याने एखादा म्हटला असता ही माझीच रणनीती होती. परंतु, ही रणनीती माझी नव्हती.”
जेव्हा आंद्रे रसेल 7 व्या क्रमांकावर फलंदाजीला आला तेव्हा केकेआरने 31 धावांत 5 गडी गमावले होते, त्यानंतर रसेलने तुफानी डाव खेळला आणि 22 चेंडूत 54 धावा फटकावल्या.
रसेलच्या या खेळी बाबत बोलताना धोनी म्हणाला की, “जेव्हा एखाद्या संघातील मुख्य फलंदाज बाद होतात, तेव्हा स्फोटक फलंदाजाकडे खेळण्यासाठी खूप चेंडू शिल्लक असतात. त्यामध्ये धावसंख्या जर 200 पार असेल तर फलंदाज अधिक स्फोटक फलंदाजी करतो आणि या सामन्यात रसेलनेही तेच केले. त्यावेळी आपण काहीच करू शकत नाही आमच्याकडे फक्त जडेजाचा पर्याय शिल्लक राहिला होता.”
महत्त्वाच्या बातम्या –
पहिल्या तीन सामन्यातील अपयशानंतर ऋतुराज गायकवाडवर का ठेवला विश्वास, धोनीने सांगितले कारण
मुंबई इंडियन्स संघाची ‘ही’ आहे सर्वात मोठी ताकद, ट्रेंट बोल्टने केला खुलासा
वा रे भावा! शतक ठोकताच २० वर्षीय पडीक्कलने मिळवले ‘या’ खास विक्रमाच्या यादीत तिसरे स्थान