---Advertisement---

इंग्लंड दौऱ्यावर गेलेले ‘हे’ दोन भारतीय खेळाडू करतायेत आपल्याच संघाविरुद्ध दोन हात, पाहा तो अनोखा नजारा

---Advertisement---

विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौर्‍यावर असून, तेथे त्यांना इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. तत्पूर्वी, मालिका सुरू होण्याआधी भारतीय संघ दोन सराव सामने खेळेल. त्यातील काउंटी एकादश विरुद्धच्या पहिल्या सराव सामन्याला डरहॅम येथे सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे या सामन्यात भारतीय संघातील दोन सदस्यच भारताविरुद्ध खेळताना दिसत आहेत.

पहिल्या सराव सामन्यात दिसणार नाही विराट
कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघ दोन सराव सामने खेळणार आहे. त्यापैकी पहिला सराव सामना डरहॅम येथील चेस्टर ले स्ट्रीट येथे खेळला जातोय. या सराव सामन्यात भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनी सहभाग घेतला नाही. त्यामुळे या संघाचे नेतृत्व अनुभवी सलामीवीर रोहित शर्माकडे देण्यात आले. विशेष म्हणजे विरोधी काउंटी एकादश संघात भारताचा युवा अष्टपैलू वाशिंग्टन सुंदर व दौऱ्यावर राखीव वेगवान गोलंदाज म्हणून गेलेला अवेश खान यांचा समावेश करण्यात आला.

सुंदर व आवेश खान हे या सामन्यात भारतीय संघाची जर्सी घालूनच खेळत आहेत तर, इतर इंग्लिश खेळाडूंनी काउंटी संघाची जर्सी परिधान केली आहे. हा सामना तीन दिवस खेळला जाईल.

भारताची खराब सुरुवात
या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. स्वतः रोहित आणि मयंक अगरवाल भारतातर्फे सलामीला आले. मात्र, रोहित ३३ चेंडूंमध्ये ९ धावा काढून जेम्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. मयंक अगरवाल याला देखील मोठी खेळी करण्यात अपयश आले. तसेच चेतेश्वर पुजारा देखील २१ धावा काढून बाद झाला.

पहिल्या सराव सामन्यासाठी भारतीय प्लेइंग इलेव्हन-
रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, केएल राहुल (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद सिराज व जसप्रीत बुमराह.

महत्त्वाच्या बातम्या – 

सीएसके संघ ऑगस्ट महिन्यात करणार आयपीएलच्या तयारीला सुरुवात, ‘या’ शहरात लावणार कॅम्प

इंग्लंड दौऱ्यातील सराव सामन्यात दंडाला काळी पट्टी बांधून मैदानात उतरला भारतीय संघ, ‘हे’ आहे कारण

अटक केलीय राज कुंद्राला, सोशल मीडियावर ट्रोल होतोय अजिंक्य रहाणे, पाहा काय आहे नक्की प्रकरण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---