भारताचा साल २०२०-२१ चा ऑस्ट्रेलिया दौरा विविध कारणांनी अनेकांच्या लक्षात राहिले. त्यातही जवळपास एक डझन भारतीय खेळाडूंना झालेल्या दुखापतींची चर्चा पुढेही होत राहिल. पण याच दरम्यान युवा खेळाडूंना कसोटीत पदार्पण करण्याची संधीही मिळाली. या पदार्पण करणाऱ्या खेळाडूंमध्ये अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरचाही समावेश आहे.
सुंदरची चर्चा मागील काही आयपीएल हंगामांपासून होत आहे. विशेष म्हणजे सुंदरने ब्रिस्बेन येथे शुक्रवारी (१५ जानेवारी) कसोटी पदार्पण करताना ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज स्टीव्ह स्मिथची विकेटही घेतली. त्यामुळे स्मिथ हा सुंदरची पहिली कसोटी विकेट ठरला आहे.
सुंदरला आत्तापर्यंत क्रिकेटमध्ये चांगले यशही मिळाले आहे. पण अनेकांना त्याच्याबाबतीत एक गोष्ट माहित नाही, ती म्हणजे त्याला एका कानाने ऐकू येत नाही.
सुंदर ४-५ वर्षांचा असताना त्याला एका कानाने ऐकू येत नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे ही गोष्ट त्याने त्याच्या पालकांना सांगितली. त्यांनी अनेक डॉक्टरांचे सल्ले घेतले. परंतु, त्यावर उपचार होऊ शकले नाही. असे असतानाही सुंदर क्रिकेट खेळत राहिला. त्याच्या पालकांनीही त्याला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यानेही आपल्या कमजोरीकडे दुर्लक्ष करत आत्तापर्यंत यशाची एक एक पायरी चढली आहे.
Today in 1999: Washington Sundar was born.
Being deaf with one ear did not come in the way of his cricket.
As a right-arm off-break he played ODI & T20I for India.@mohanstatsman @cricketaakash #OnThisDay @Sundarwashi5
— Dilip Singh (@Statsdilip) October 5, 2020
सुंदरला आयपीएल २०१७ ला पहिल्यांदा रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघात दुखापतग्रस्त आर अश्विन ऐवजी संधी मिळाली होती. तेव्हापासून तो सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. विशेष म्हणजे आयपीएलच्या पदार्पणातच त्याने सामनावीर पुरस्कारही मिळवला होता. त्यावेळी त्याचे वय १७ वर्षे २३३ दिवस इतके होते. त्यामुळे तो आयपीएलमध्ये सामनावीर पुरस्कार मिळवणारा सर्वात युवा क्रिकेटपटू ठरला होता. तसेच त्यावेळी त्याचा कर्णधार स्मिथ होता. त्यामुळे आयपीएलमधील आपल्या पहिल्याच कर्णधाराला बाद करत त्याने त्याची पहिली कसोटी विकेट मिळवली.
याआधी त्याने डिसेंबर २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आत्तापर्यंत भारताकडून १ वनडे आणि २३ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. यात त्याने वनडेत १ विकेट आणि आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये १९ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडीयाचं दुखापतीचं ग्रहण संपेना! चालू सामन्यात जायबंदी झाल्याने ‘हा’ प्रमुख गोलंदाज मैदानाबाहेर
एकेवेळी कापायचा क्रिकेट मैदानावरील गवत, आज नावावर आहेत १०० कसोटी सामने