इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) सनरायझर्स हैदराबाद संघाने नुकतेच हंगामात दमदार पुनमरागन केले आहे. सुरुवातीचे २ सामने गमावल्यानंतर हैदराबाद संघाने त्यांचे पुढील सलग २ सामने जिंकले आहेत. सोमवारी (११ एप्रिल) गुजरात टायटन्सला ८ विकेट्सने पराभूत करत त्यांनी ४ गुण खात्यात नोंदवले आहेत. मात्र विजयपथावर असलेल्या हैदराबाद संघासाठी एक वाईट बातमी पुढे येत आहे. हैदराबादचा स्टार फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर याला दुखापत झाली असून तो पुढील काही सामन्यांना मुकू शकतो.
सुंदरला (Washington Sundar) गुजरातच्या फलंदाजीदरम्यान दुखापत झाली (Washington Sundar Injured) होती. त्यानंतर तो मैदानाबाहेरही गेला होता. परिणामी त्याला त्याच्या वाट्याची ४ षटकेही पूर्ण करता आली नाहीत. त्याने केवळ ३ षटके गोलंदाजी केली. त्याचे उरलेले एक षटक ऍडम मार्करमने पूर्ण केले.
यानंतर आता त्याच्या दुखापतीविषयी अपडेट पुढे आली आहे की, वॉशिंग्टन दुखापतीमुळे पुढील २ आठवडे (Washington Sundar To Miss 1-2 Weeks) आयपीएल खेळू शकणार नाहीय. हैदराबाद संघाचे मुख्य प्रशिक्षक टॉम मूडी (Tom Moody) यांनी सामन्यानंतर पत्रकार परिषदेत वॉशिंग्टनच्या उपलब्धतेविषयी माहिती दिली आहे.
“वॉशिंग्टन सुंदरच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे. आम्ही पुढील २-३ आठवडे त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवणार आहोत. अपेक्षा आहे की, हा संघासाठी मोठा झटका नसेल. मला वाटते की, त्याला दुखापतीतून सावरण्यासाठी कमीत कमीत १-२ आठवडे लागतील,” असे ते म्हणाले आहेत.
वॉशिंग्टन या हंगामात चांगल्या फॉर्ममध्ये दिसला आहे. पावरप्लेमध्ये विकेट्स घेण्याबरोबरच त्याने खालच्या फळीत बॅटने योगदान दिले आहे. परंतु आता पुढील काही सामन्यांमध्ये हैदराबाद संघाला त्यांच्या संघ संयोजनात बदल करावे लागणार आहेत. त्याच्याजागी श्रेयस गोपाल किंवा जगदीशा सुचिथ यांपैकी एकाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाऊ शकते.
सनरायझर्स हैदराबादची या हंगामातील कामगिरी
हैदराबादला (Sunrisers Hyderabad) त्यांच्या हंगामातील राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. त्यानंतर लखनऊ सुपरजायंट्सनेही त्यांना पराभूत केले होते. मात्र त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध हैदराबाद संघाने दमदार पुनमरागमन केले आणि हंगामातील पहिला विजय नोंदवला. त्यानंतर आता गुजरात संघाला त्यांनी पराभूत करत दुसरा विजय नोंदवला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘ती’ अविस्मरणीय खेळी, जेव्हा ब्रायन लाराने विरोधकांची पिसे काढत चोपल्या होत्या बिनबाद ४०० धावा
उमरानच्या १४०kphचा चेंडू मारण्याच्या प्रसंगावर हार्दिक म्हणाला, ‘मी अशा गोलंदाजांना असंच जाऊ देणार…’
आई गं! षटकार मारण्याच्या प्रयत्नात त्रिपाठीने स्वत:लाच केले जखमी, वेदनेने मैदानावरच लागला तडफडू