---Advertisement---

तुम्हाला माहित आहे का? वसिम अक्रमने फलंदाजीत पाॅटींग-तेंडूलकरलाही टाकले आहे मागे

On: मंगळवार, मार्च 31, 2020 2:03 PM
---Advertisement---

कसोटीमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग, जॅक कॅलिस यांनी अनेक मोठे विक्रम केले आहेत. कसोटीत सर्वाधिक धावा करण्याच्या यादीतही हे तिघे अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावर आहेत.

सचिनने कसोटीत १५९२१ धावा, पाँटिंगने १३३७८ धावा आणि कॅलिसने १३२८९ धावा केल्या आहेत. या तिघांनीही अनेकदा मोठ्या आणि महत्त्वाच्या खेळी केल्या आहेत. मात्र या तिघांनाही कसोटीत कधीही त्रिशतकी खेळी करता आली नाही.

नाबाद २४८ धावा या सचिनच्या कसोटीतील सर्वोच्च वैयक्तित धावा आहेत. २५७ धावा या पाँटिंगच्या सर्वोच्च वैयक्तीक धावा आहेत. तर २२४ धावा ही कॅलिसची सर्वोच्च वैयक्तीक खेळी आहे.

विशेष म्हणजे पाकिस्तानचा दिग्गज वेगवान गोलंदाज वासिम अक्रम कसोटीत सर्वोच्च वैयक्तिक धावांची खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्यांच्यापेक्षा वर आहे. आक्रमने झिम्बाब्वे विरुद्ध ऑक्टोबर १९९६ला शेखूपुरा येथे झालेल्या कसोटी सामन्यात नाबाद २५७ धावांची खेळी केली होती.

त्याने त्या सामन्यात पाकिस्तानच्या पहिल्या डावात ८ व्या क्रमांकावर फलंदाजीला येत ही खेळी केली होती. त्या खेळीत त्याने १२ षटकार मारले होते. त्यावेळी तो पाकिस्तान संघाचा कर्णधार देखील होता.

कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या सचिनने त्याच्या कारकिर्दीत ६ वेळा द्विशतकी खेळी केली आहे. तसेच त्याच्या नावावर ५१ शतके आहेत. त्याचबरोबर पाँटिंगनेही ६ वेळा कसोटीत द्विशतक केले आहे. तर कॅलिसने त्याच्या ४५ शतकांपैकी २ वेळा द्विशतके केली आहेत.

ट्रेंडिंग घडामोडी – 

क्रिकेट ऑस्ट्रेलियाला अच्छे दिन? स्मिथ या कारणाने पुन्हा होऊ शकतो कर्णधार

हे आहेत आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात पदार्पण करणारे क्रिकेटपटू

…म्हणून वनडे क्रिकेटमध्ये गोलंदाज म्हणून सचिन शेन वाॅर्नपेक्षा आहे भारी

क्रिकेटमध्ये सर्वाधिक लांब षटकार मारणारे ५ फलंदाज

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे ५ खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---