---Advertisement---

तेंडुलकर, गावस्कर, द्रविड यांनाही न जमलेली गोष्ट ४० वर्षीय वसीम जाफरने करून दाखवली

On: गुरूवार, जानेवारी 24, 2019 6:28 PM
---Advertisement---

रणजी ट्रॉफी स्पर्धेत आजपासून (24 जानेवारी) विदर्भ विरुद्ध केरळ यांच्यात पहिला उपांत्य फेरीचा सामना सुरू झाला आहे. यावेळी वसीम जाफरने या हंगामात 1000 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे.

जाफर हा रणजी ट्रॉफीच्या दोन हंगामात प्रत्येकी 1000 धावांचा टप्पा पार करणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. याआधी त्याने 2008-09च्या हंगामात मुंबईकडून खेळताना 1260 धावा केल्या होत्या. ह्या धावा त्याने 16 डावांमध्ये 84च्या सरासरीने पूर्ण केल्या होत्या.

आज जाफरला 1000 धावांचा टप्पा गाठण्यासाठी 31 धावांचीच गरज होती. त्याने या हंगामातील 13 व्या डावात खेळताना हा 1000 धावांचा टप्पा गाठला आहे. यामध्ये त्याने या हंगामात 4 शतकेही केली आहेत. तसेच याच हंगामात तो रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू देखील ठरला आहे.

या सामन्यात विदर्भाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यांच्या गोलंदाजांनी हा निर्णय अचूक ठरवत केरळला 106 धावांवरच रोखले. यामध्ये उमेश यादवने 12 षटकात 48 धावा देत 7 विकेट्स पटकावल्या.

विदर्भाने पहिल्या डावाची चांगली सुरूवात केली. त्यांचा सलामीवीर आणि कर्णधार फैज फजलने 75 धावा केल्या. तर जाफरने 34 धावा जोडल्या आहेत. यामुळे विदर्भाने 65 धावांनी आघाडी घेतली आहे. तत्पूर्वी त्यांनी 5 गडी गमावत 171 धावा केल्या आहेत.

या हंगामात जाफरने उपांत्यपूर्व फेरीत उत्तराखंड विरुद्ध 296 चेंडूत 206 धावा करत संजय रामास्वामी  सोबत 304 धावांची भागीदारी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

केएल राहुल,हार्दिक पंड्याला मिळाली सर्वात मोठी खुशखबर, होऊ शकतो टीम इंडियात समावेश

ऑस्ट्रेलिया दौरा गाजवलेला टीम इंडियाचा सदस्य आता खेळणार रणजी सामने

सांगलीकर स्मृती मानधना न्यूझीलंड विरुद्ध चमकली, मिळवून दिला टीम इंडियाला पहिला विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment