---Advertisement---

‘रोहितने सलामी सोडून चौथ्या क्रमांकावर खेळावे’; मुंबईकर दिग्गजाची नवी कल्पना

On: मंगळवार, सप्टेंबर 13, 2022 11:18 PM
Rohit Sharma
---Advertisement---

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात सुरू होणाऱ्या आठव्या टी20 विश्वचषकासाठी (T20 World Cup) भारतीय संघ जाहीर झाला. 15 जणांच्या या संघामध्ये रोहित शर्मा कर्णधार तर केएल राहुल उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. तसेच चार खेळाडूंना राखीव स्वरूपात संघात घेतले आहे. ऑस्ट्रेलियाची परिस्थिती पाहता भारतीय संघनिवडकर्त्यांनी हा निर्णय घेतला आहे. या संघात यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंत व दिनेश कार्तिक यांना संधी मिळाली. त्यानंतर आता भारताचा माजी सलामीवीर वसिम जाफर याने ट्विट करत भारतीय कर्णधार रोहित शर्मा याला एक सल्ला दिला आहे.

भारतीय संघात यष्टीरक्षक रिषभ पंत याला संधी मिळाल्यानंतर अनेक चर्चा होत आहेत. रिषभ बेजबाबदारपणे खेळत असताना त्याला वारंवार संधी का दिली जात आहे? संजू सॅमसनवर अन्याय का होतोय? हे प्रश्न सोशल मीडियावरून विचारले जात आहेत. या सर्वात भारताचा माजी सलामीवीर वसिम जाफरने वेगळी प्रतिक्रिया दिली आहे. रिषभला संघात ठेवल्याचे त्याने समर्थन केले. मात्र, त्याचवेळी कर्णधार रोहित शर्माला सल्लाही दिला.

 

त्याने केलेल्या ट्विटमध्ये लिहिले,

‘मला अजूनही वाटते टी20 मध्ये रिषभ पंतसाठी सलामीवीराची जागा सर्वात योग्य आहे. रोहितने त्याच्याजागी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला यावे. 2013 चॅम्पियन्स ट्रॉफीवेळी धोनीने रोहितला सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पुढे जे घडले तो इतिहास आहे. पंत, राहुल, विराट, रोहित व सूर्या माझे पाच फलंदाज आहेत.”

जाफर हा मागील काही मालिकांपासून सातत्याने पंतला सलामीला पाठवायला हवे असे म्हणताना दिसतोय. त्याने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दोन सामन्यात सलामीवीराची भूमिका पार देखील पाडली होती. तसेच यापूर्वी आयपीएलमध्ये तो डावाची सुरुवात करताना दिसलेला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता धवन‌ फक्त ‘बदली कर्णधार’ म्हणूनच संघात सामील होणार का?
रैना, इरफानने गायलेल्या गाण्यांवर युवीचा बेधुंद डान्स, हा व्हिडिओ नाही पाहिला तर काय पाहिले!
अर्शदीपच्या निवडीनंतर आईने दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “माझ्या मुलाने या वयात…”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---