---Advertisement---

आयपीेएलबाबत वसीम जाफरचे मोठे वक्तव्य; ‘या’ खेळाडूंना भारतीय संघात स्थान न देण्याचा दिला सल्ला

wasim jaffer on bcci
---Advertisement---

सध्याच्या काळात भारतीय संघात प्रवेश मिळवणे आयपीएलमुळे सोप्पे झाले आहे. यामुळे एखाद्या खेळाडूने जर एखाद्या हंगामात चांगले प्रदर्शन केले, तर त्या प्रदर्शनाच्या जोरावर त्या खेळाडूला भारतीय संघात सहज जागा मिळते आणि सर्वात जास्त युवा खेळाडू टी20 संघात आपले पदार्पण करताना दिसतात. जास्त खेेळाडू असल्याने निवड समितीसमोर चांगला आणि मजबूत संघ निवडण्याचे आव्हान असते. याविषयी भारतीय संघाचा माजी सलामीवीर वसीम जाफर याने ट्वीट करत आपले मत व्यक्त केले आहे. त्याने भारतीय संघात सहज जागा न देण्याचा सल्ला दिला आहे.

नुकत्याच आयपीएलच्या पंजाब किंग्ज (Punjab Kings) संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी वसीम जाफर (Wasim Jaffer) यांनी भारतीय संघात स्थान मिळण्यावर आपले मत मांडले आहे. ते म्हणाले की,” पहिल्या आयपीएल हंगामात चांगले प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूला लगेच भारतीय संघात स्थान देण्याची गरज नाही. त्या खेळाडूंना देशांतर्गत स्पर्धांच्या दोन-तीन हंगामामध्ये त्यांना चांगले प्रदर्शन करु दिले पाहिजे. त्यांना परिपक्व होऊ दिले पाहिजे. याच कारणामुळे आपण निवड प्रक्रियेत स्वत:ला गुंतवून घेतो. कोणत्याही खेळाडूला सहज सोप्या पद्धतीने भारतीय संघात स्थान नाही द्यायला पाहिजे तर खेळाडूंना हे कमवता आले पाहिजे.”

मागील काही काळाच भारतीय क्रिकेट बोर्डाने अनेेक युवा खेळाडूंना राष्ट्रीय संघात स्थान दिले आहे. त्यातील काही खेळाडूंनी फक्त एक-दोन हंगामात चांगले प्रदर्शन केलेले असते. बीसीसीयने आपल्या उद्दिष्टामध्ये दोन भारतीय संघ तयार करण्याचा दावा केला, ज्यामुळे एकाच वेळी दोन भारतीय संघ दोन वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेउ शकतात. आयपीएलमध्ये अनेक खेळाडू असे आहेत ज्यांनी एका हंगामात धमाकेदार प्रदर्शन केले. मात्र, देशांतर्गत स्पर्धेत खेळताना त्यांचे प्रदर्शन सामान्य राहिले. यामुळे वसीम जाफर यांनी खेळाडूंना सहजरीत्या राष्ट्रीय संघात स्थान न देण्याचा सल्ला दिला. (Wasim Jaffer adviced selectors not to select those youngsters who performed in Single IPL season)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
द्युती चंद अडकली विवाहबंधनात! आपल्या समलैंगिक साथीदाराशी बांधली सात जन्माची गाठ
भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची दुकानदाराला मारहाण, सीसीटीव्ही फुटेज होतेय व्हायरल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---