इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने चांगली सुरुवात केली. इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताचे सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी आपल्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला शतकीय भागीदारी करत चांगली सुरुवात मिळवून दिली.
दरम्यान, भारताचा माजी फलंदाज वसीम जाफर आणि इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यांच्यातील सोशल मीडियावरील ‘कोल्डवॉर’ सर्वांच्या परिचयाचा आहे. आता पुन्हा हे दोघं ट्विटरवर आमने-सामने आले.
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील लॉर्ड्सवरील दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने लॉर्ड्सचे वातावरण आणि परिस्थिती पाहता, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावर वॉनने सामन्यापूर्वी ट्विट करत लिहिले “गोलंदाजीसाठी पूरक असे मैदान.” यावर जाफरने त्यांना ट्रोल केले.
Lovely day for bowling at lords … #ENGvIND
— Michael Vaughan (@MichaelVaughan) August 12, 2021
वॉनच्या ट्विटला रिप्लाय करत जाफरने वेस्टइंडीजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलचा फोटो पोस्ट केला आहे. ज्यात गेल एक मोठी घंटा वाजवताना दिसत आहे. याच्या आधीही पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी वॉनने “फलंदाजीसाठी पूरक मैदान” असे ट्विट केले होते. मात्र सामन्यात बुमराहने कमालीची गोलंदाजी करत पहिल्या डावात ४ तर दुसऱ्या डावात ५ विकेट्स घेत इंग्लंडवर दबदबा राखला होता.
😆 #ENGvsIND https://t.co/hxLeZB1ZHH pic.twitter.com/W7bumEjHvk
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) August 12, 2021
भारताच्या पहिल्या डावात ३६४ धावा
भारताचा पहिला १२६.१ षटकात ३६४ धावांवर संपुष्टात आला आहे. भारताकडून पहिल्या डावात केएल राहुलने १२९ धावांची शतकी खेळी केली. तर रोहित शर्माने ८३ धावांची शतकी खेळी केली. त्याचबरोबर विराट कोहली (४२), रविंद्र जडेजा (४०) आणि रिषभ पंत (३७) यांनी छोटेखानी, पण महत्त्वपूर्ण खेळी केल्या. इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या, तर ऑली रॉबिन्सन आणि मार्क वूडने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. मोईन अलीला १ विकेट मिळाली.
रुट-बर्न्सने सावरला इंग्लंडचा डाव
भारताचा पहिला डाव संपल्यानंतर इंग्लंड संघ फलंदाजीला उतरला. इंग्लंडची सुरुवात खराब झाली. १५ व्या षटकात मोहम्मद सिराजने सलग २ चेंडूत डॉमनिक सिब्ली आणि हसीब हमीद यांना बाद केले. मात्र, यानंतर कर्णधार जो रुट आणि सलामीवीर रॉरी बर्न्स यांनी इंग्लंडचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी केली.
मात्र, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यास काही वेळ बाकी असताना मोहम्मद शमीने बर्न्सला ४९ धावांवर बाद केले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने ४५ षटकांत ३ बाद ११९ धावा केल्या आहेत, दुसऱ्या दिवसाखेर रुट ४८ धावांवर आणि बेअरस्टो ६ धावांवर नाबाद आहेत.
महत्वाच्या बातम्या –
–ऑस्ट्रेलियाला बसणार मोठा धक्का? चक्क नियमित कर्णधारच टी२० विश्वचषकात न खेळण्याची शक्यता
–“महान खेळाडूची हीच ओळख असते, जेव्हा तो फॉर्ममध्ये नसतो तेव्हा तो…”, माजी क्रिकेटरचा विराटला पाठिंबा
–भारताच्या ‘या’ दोन महिला क्रिकेटपटूंची ‘द हंड्रेड’मधून माघार; ‘हे’ दिले कारण