पुढच्या महिन्यात भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात संघाला दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. शुक्रवारी (24 जून) वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी आणि वनडे मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली. संघत काही प्रमुख बदल पाहायला मिळाल्यामुळे चाहते आणि जाणकार व्यक्त होत आहेत. भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफर यानेही निवड प्रक्रियेवर काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
वसीम जाफर (Wasim Jaffer) नेहमीच सोशल मीडियावर व्यक्त होत असतो. शुक्रवारी बीसीसीआयने वनडे आणि कसोटी संघाची घोषणा करताच सर्वत्र याच चर्चा सुरू झाल्या. अजिंक्य रहाणेला पुन्हा कसोटी कर्णधार बनवण्यासाठी, तर कुणी ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जयस्वाल यांना कसोटी संघात घेतल्यामुळे निवड प्रक्रियेचे कौतुक करत आहेत. तर काहीजण चेतेश्वर पुजाराला संघातून बाहेर केल्यामुळे टीका करत आहेत. अशात वसीम जाफरने तीन प्रश्न उपस्थित केले, ज्याची उत्तरे देने निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाला कदाचित जड जाऊ शकते. आपल्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून जाफरने हे तीन प्रश्न उपस्थित केले आहेत.
पहिल्या प्रश्नात जाफर विचारतो की, वेस्ट इंडीज दौऱ्यातसाठी संघात चार सलामीवीर फलंदाजांची काय गरज आहे? रोहित शर्मा, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जयस्वाल या चार खेळाडूंना या दौऱ्यासाठी संघात घेतले आहेत. जाफरच्या मते चार सलामीवीरांच्या जागी मध्यक्रमात उत्तम कामगिरी करू शकतो, अशा सरफराज खानला संघात घेता आले असते. सरफराज मागच्या काही हंगामांपासून रणजी क्रिकेट गाजवत आला आहे.
पुजाराच दुसरा प्रश्न असा होता की, अभिमन्यू ईश्वरन आणि प्रियांक पांचाल यांनी रणजी आणि देशासाठी खेळताना अप्रतिम प्रदर्शन केले आहे. मागच्या मोठ्या काळापासून हे खेळाडू कसोटी क्रिकटेचा दरवाजा ठोठावत आहेत. संघात त्यांची निवड फक्त यामुळे होत नाहीये की, ते आयपीएलमध्ये खेळत नाहीत? ऋतुराज गायकवाड कसा यांच्या आधी लाईनमध्ये आला. एक महिन्यांच्या विश्रांतीनंतरही शमीला विश्रांती दिल्यामुळे जाफर हैराण आहे. जाफरच्या मते शमी एक असा गोलंदाज आहे की, तो जितका अधिक खेळेल, तितके चांगले प्रदर्शन करू शकतो. (Wasim Jaffer asked three questions on the Indian teams selected for the West Indies tour)
महत्वाच्या बातम्या –
हद्दच केली! चेंडू टाकण्याआधी वाचली स्क्रिप्ट, वर्ल्डकप क्वॉलिफायर सामन्यातील VIDEO तुफान व्हायरल
तेव्हापासून क्रिकेटला जगभरात लोकप्रियता मिळू लागली, बरोबर 85 वर्षांपूर्वी खेळला गेलेला ऐतिहासिक सामना