भारतीय संघाने भारतात आणि भारताबाहेर झालेल्या द्विपक्षीय मालिकांमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये या संघाला आयसीसीच्या स्पर्धांमध्ये जेतेपद मिळवण्यात अपयश येत आहे. यावर्षी भारतीय संघाने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना गमावल्यानंतर टी२० विश्वचषक स्पर्धेत देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता भारतीय संघाला जेतेपद मिळवण्यासाठी माजी भारतीय फलंदाज वसीम जाफर यांनी आगळा-वेगळा सल्ला दिला आहे.
वसीम जाफर हे सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह असतात. ते मजेशीर मीम आणि फोटो शेअर करत असल्याकारणाने नेहमीच चर्चेत येत असतात. नुकताच त्यांनी सचिन तेंडुलकरचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये सचिन तेंडुलकरने भारतीय संघाची पिवळ्या रंगाची जर्सी घातली आहे. ९० च्या दशकात भारतीय संघाची जर्सी देखील पिवळ्या रंगाची होती. हा फोटो शेअर करत त्यांनी पिवळ्या रंगाची जर्सी पुन्हा आणण्याची वेळ आली आहे, असे म्हटले आहे.
यामागील प्रमुख कारण म्हणजे, तुम्ही जर २०२१ वर्षातील महत्त्वाच्या स्पर्धा पाहिला, तर पिवळा रंगाची जर्सी असलेल्या संघांचा बोलबाला राहिला आहे. हे सर्व आयपीएल २०२१ स्पर्धेच्या अंतिम सामन्यापासून सुरू झाले आहे. आयपीएल २०२१ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात पिवळ्या रंगाची जर्सी असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने बाजी मारली.
तसेच आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या अंतिम फेरीत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी प्रवेश केला होता. या सामन्यात पिवळ्या रंगाची जर्सी असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने जेतेपद पटकावले होते. तर, नुकताच संपन्न झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२१ स्पर्धेत देखील पिवळ्या रंगाची जर्सी असलेल्या तामिळनाडू संघाने जेतेपदावर नाव कोरले. त्यामुळे वसीम जाफर यांनी हा फोटो शेअर केला आहे.
Seeing teams in yellow winning trophies, time to bring this jersey back? #INDvNZ #T20WorldCup pic.twitter.com/Sd9HHT1c2k
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) November 23, 2021
वसीम जाफर यांनी सचिन तेंडुलककरचा जो फोटो ट्विट केला आहे. तो १९९४ विल्स ट्रॉफी स्पर्धेचा आहे. या स्पर्धेत भारतीय संघासह, पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया या संघांचा समावेश होता. याच स्पर्धेत सचिन तेंडुलकरने आपल्या वनडे कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले होते. हे शतक त्याने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झळकावले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
डीविलियर्स, विराटसारख्या दिग्गजांनी केला धनश्री वर्माच्या इशाऱ्यावर डान्स, पाहा व्हिडिओ
श्रेयसचे कसोटी पदार्पण जवळपास पक्के, पण तरी ‘या’ फलंदाजाकडून मिळू शकते आव्हान
“तो फॉर्ममध्ये येईल आणि धावा देखील करेल”, सतत फ्लॉप ठरत असलेल्या रहाणेची पुजाराकडून पाठराखण