आयपीएल 2023चा लिलाव नुकताच कोचिन येथे पार पडला. आयपीएलच्या सोळाव्या हंगामासाठी प्रत्येक फ्रेंचायझी संघाने कंबर कसली आहे. त्यामध्ये मागच्या हंगामात पदार्पण करणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्स या संघाचा देखील समावेश आहे. या लिलावात एलएसजी संघाने निकोलस पूरन याच्यावर पैशांची उधळपट्टी केली. लखनऊ संघाने या खेळाडूला 16 कोटी रुपयांमध्ये विकत घेत आपल्या संघात सामील केले. मात्र, या खेळाडूचे आयपीेएलमधील प्रदर्शन सामन्यच राहिले आहे. त्यावर भारतीय संघाचा माजी खेळाडू वसीम जाफर याने आपले मत व्यक्त केले आहे.
कोचिन येथे पार पडलेल्या या लिलावात निकोलस पूरन (Nicolas Pooran) सर्वात महागडा यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. मागच्या हंगामात मुंबई इंडियन्सने ईशान किशन याला 15.25 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. तसेच, पूरन याने आयपीएल 2022मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघासाठी खेळला होता. मेगा ऑक्शनमध्ये हैदराबादने त्याला 10.25 कोटी रुपयांमध्ये खरेदी करत आपल्या संघात सामील केले होते. मात्र, भारतीय संघाचा माजी दिग्गज खेळाडू वसीम जाफर (Wasim Jaffer) याचे मत आहे की त्याला त्याच्या प्रदर्शनाच्या तुलनेत जास्त रक्कम मिळाली.
वसीम जाफर माध्यमांशी बोलताना म्हणाला की, “लखनऊजवळ डॅनियल सॅम्स, रोमारियो शेफर्ड यांसारखे चांगले खेळाडू आहेत. मला वाटते की निकोलस पूरन त्यांच्यासाठी चांगला सौदा ठरु शकतो. मात्र, प्रश्न हा आहे की तो आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन करु शकतो की नाही. पूरन पुन्हा त्याच श्रेणीमध्ये आला आहे, की तो चांगला खेळाडू आहे, पण आयपीएलमध्ये चागंले प्रदर्शन करत नाहीये. तरीही मला वाटते की त्याला त्याच्या प्रदर्शनाच्या तुलनेत जास्त रक्कम मिळालेली आहे.”
आयपीेलमध्ये पूरनने आतापर्यंत 47 सामने खेळले आहेत. ज्यात त्याने 151.24 च्या स्ट्राईक रेटने 912 धावा केल्या. मागच्या हंगामातील 13 डावांमध्ये 306 धावा केल्या. यंदाच्या हंगामासाठी त्याला हैदराबाद संघानेे रिलिज केले होते. आता तो लखनऊ संघाकडून खेळताना दिसेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘पूरनला कशासाठी 16 कोटी?’, लिलावात मिळालेल्या रकमेमुळे भारतीय दिग्गजाचा संतप्त सवाल
अश्विनने भारतीय फलंदाजांच्या डिफेन्सवरच उपस्थित केले प्रश्नचिन्ह; म्हणाला, ‘त्यांना स्वत:च्या…’