---Advertisement---

वृद्धिमान साहाकडून सलामी, तर ‘या’ खेळाडूला करा संघाबाहेर, माजी भारतीय क्रिकेटपटूने सुचवला पर्याय

wriddhiman-saha
---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना कानपूरमध्ये पार पडला आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. या सामन्यात विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे कर्णधारपद अजिंक्य रहाणेच्या हाती देण्यात आले होते, तर मुंबईत होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहली पुनरागमन करणार आहे. अशातच प्लेइंग इलेव्हनमधून कुठल्या खेळाडूला बाहेर केले जाईल, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत अनेक दिग्गजांनी आपले मत दिले आहे. अशातच माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफर यांनी देखील याबाबत आपले मत मांडले आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात मयांक अगरवाल आणि शुबमन गिल यांना डावाची सुरुवात करण्याची संधी देण्यात आली होती. शुबमन गिलने पहिल्या डावात अर्धशतक झळकावले. परंतु, मयांक अगरवाल दोन्ही डावात फ्लॉप ठरला. त्याने पहिल्या डावात १५, तर दुसऱ्या डावात १३ धावा केल्या. तसेच कर्णधार अजिंक्य रहाणे देखील दोन्ही डावात फ्लॉप ठरला आहे. त्याने पहिल्या डावात ३५, तर दुसऱ्या डावात त्याला अवघ्या ४ धावा करण्यात यश आले.

अशातच ईएसपीएन क्रिकइंफोला दिलेल्या मुलाखतीत वसीम जाफरने म्हटले की, “मी मयांक अगरवाल आणि अजिंक्य रहाणे या दोघांपैकी एकाला पुढच्या सामन्यात संघाबाहेर होताना पाहतोय. कर्णधार कोहलीने पुढच्या सामन्यात कोणाला संघाबाहेर ठेवायचे आणि कोणाला संघात स्थान द्यायचे हे ठरवायचे आहे. मेलबर्न कसोटीनंतर रहाणेने गेल्या १०-१२ सामन्यांमध्ये पुरेशा धावा केल्या नाहीत, त्यामुळे तो बाहेर पडू शकतो, असे मला वाटते. परंतु, हा निर्णय कठीण आहे. बघूया पुढच्या सामन्यात कोणाला संघाबाहेर केले जाते.”

तसेच त्याचे म्हणणे आहे की, मयांक अगरवाल बाहेर झाला, तर त्याच्या ऐवजी वृद्धिमान साहाने डावाची सुरुवात करावी. याबाबत बोलताना तो म्हणाला की, “माझे असे मत आहे की, जर मयांक अगरवाल संघाबाहेर झाला, तर वृद्धिमान साहाने डावाची सुरुवात करावी. कारण, त्याने जर डावाची सुरुवात केली, तर इतर फलंदाज आपल्या नेमलेल्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतील. वृद्धिमान साहा भारतीय परिस्थितीत डावाची सुरुवात करू शकतो.”

महत्त्वाच्या बातम्या – 

पॅट कमिन्सचा मोठा खुलासा! कर्णधारपद सोपवण्यापूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ठेवली होती ‘ही’ अट

‘तिसऱ्या पंचांची खराब पंचगिरी’, यष्टीचीत झालेल्या रॉस टेलर जीवनदान मिळाल्याने भडकले भारतीय चाहते

कानपूर कसोटीची नाट्यमय अखेर! न्यूझीलंडच्या प्रयत्नांना निसर्गाची साथ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---