भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धा संपून महिना उलटला नाही, तोवर विजय हजारे ट्रॉफीची तयारी सुरू झाली आहे. परंतु या स्पर्धेची सुरुवात होण्यापूर्वीच उत्तराखंडचे प्रशिक्षक वसीम जाफर यांनी राजीनामा दिला. संघानिवडीत हस्तक्षेप केल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतले आहे. जाफर यांनी धर्माच्या आधारावर खेळाडूंची निवड करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप उत्तराखंड क्रिकेट संघाने केला आहे. पण दुसरीकडे जाफर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
वसीम जाफर यांनी दिले स्पष्टीकरण-
आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर जाफर यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. ‘उत्तराखंड क्रिकेट संघाचे सचिव माहिम वर्मा यांच्या आरोपांमुळे मला त्रास झाला आहे. या प्रकरणाला जो काही धार्मिक रंग दिला जात आहे, ते खूप दु:खद आहे. मी इक्बाल अब्दुल्लाचे समर्थन करतो आणि त्याला कर्णधार बनवू इच्छित होतो, हा त्यांनी केलेला आरोप चुकीचा आहे. खरे तर मी जय बिस्ताला कर्णधारपद सोपवण्याचे मत मांडले होते. परंतु संघाच्या अधिकाऱ्यांनी इक्बालला पाठिंबा देत त्याला ही जबाबदारी देण्याचे ठरवले’, असे त्यांनी म्हटले.
पुढे बोलताना जाफर यांनी म्हटले की, ‘उत्तराखंड संघाच्या सराव सत्रात मौलवींना नमाज पठणासाठी बोलावण्याचा आरोपही माझ्यावर करण्यात आला आहे. हे अगदी खरे आहे की, ते मौलाना देहरादूनच्या शिबिरात दोन-तीन शुक्रवार आले होते आणि आम्ही नमाज पठण केले. पण त्यांना मी बोलावले नव्हते.
‘इक्बाल अब्दुल्लाने नमाजासाठी माझी आणि संघ व्यवस्थापकाची परवानगी मागितली होती. आम्ही दररोज आपापल्या खोलीतच नमाज पठण करायचो. परंतु शुक्रवारचा नमाज एकत्र व्हायचा. सराव सत्रानंतर आम्ही पाच मिनिटे ड्रेसिंग रूममध्ये नमाज पठण केले. जर हे सांप्रदायिक असते, तर नमाजासाठी मी सरावाची वेळ बदलली असती. पण मी तसे केले नाही. यात काय मोठी गोष्ट आहे, हे मला समजले नाही,’ अशी प्रतिक्रिया शेवटी जाफर यांनी दिली आहे.
1. I recommended Jay Bista for captaincy not Iqbal but CAU officials favoured Iqbal.
2. I did not invite Maulavis
3. I resigned cos bias of selectors-secretary for non-deserving players
4. Team used to say a chant of Sikh community, I suggested we can say "Go Uttarakhand" #Facts https://t.co/8vZSisrDDl— Wasim Jaffer (@WasimJaffer14) February 10, 2021
एका वर्षाच्या आतच प्रशिक्षकपदाचा राजीनामा-
वसीम जाफर यांच्यावर मागील वर्षी उत्तराखंड क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली होती. परंतु संघ निवडीमध्ये हस्तक्षेप होत असल्यामुळे तसेच संघ अधिकारी पक्षपाती वागणूक देत असल्याचा आरोप करत त्यांनी एका वर्षाच्या आतच राजीनामा दिला आहे.
यावेळी जाफर यांनी उत्तराखंड क्रिकेट असोसिएनला पाठवलेल्या इमेलमध्ये लिहिले होते की, ”मी खेळाडूंसाठी खरोखरच दुःखी आहे. कारण मला वाटते की त्यांच्यात बरीच क्षमता आहे आणि ते माझ्याकडून बरेच काही शिकू शकतात. परंतु योग्य खेळाडूंच्या निवडीसाठी निवड समिती आणि सचिव यांच्या हस्तक्षेपामुळे त्यांना ती संधी मिळत नाही”.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताचे माजी क्रिकेटपटू वसीम जाफर झाले नाराज, तडकाफडकी दिला उत्तराखंडच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा
‘गोरी तेरी आँखें कहें’, युझवेंद्र चहलचा पत्नी धनश्रीसोबतचा रोमँटिक लूक भन्नाट व्हायरल, पाहा फोटो