---Advertisement---

दुसरी कसोटी गमावल्यानंतर भारतीय क्रिकेटरला आठवला रहाणे; म्हणाला, ‘राहुलऐवजी त्याला कर्णधार…’

On: शनिवार, जानेवारी 8, 2022 4:22 PM
Ajinkya Rahane
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेला भारतीय संघ (India Tour Of South Africa) सध्या ऐतिहासिक विजयासाठी झगडताना दिसतो आहे. सेंच्यूरियन येथील पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर भारताला जोहान्सबर्ग येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यासह ३ सामन्यांची कसोटी मालिका सध्या १-१ ने बरोबरीत आहे.

जोहान्सबर्ग कसोटी (Johannesburg Test) जिंकत मालिका खिशात घालण्याची पाहुण्या भारताकडे संधी होती. भारताच्या कसोटी संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर होता. त्याच्या गैरहजेरीत केएल राहुल (KL Rahul) याच्या हाती संघाच्या नेतृत्त्वाची कमान देण्यात आली होती. संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावरून आता माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफर (Wasim Jaffer) यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी भारताचा उपकर्णधार म्हणून रोहित शर्मा याची निवड करण्यात आली होती. परंतु दुखापतीमुळे तो या मालिकेतून बाहेर झाला आणि त्याच्याजागी केएल राहुलला संघाचा उपकर्णधार बनवले गेले होते. परंतु संघाचा नियमित कर्णधार विराटच्या अनुपस्थित राहुलच्या हाती नेतृत्त्वाची सूत्रे देण्यात आली. परंतु जाफर यांना संघ व्यवस्थापनाचा हा निर्णय आवडलेला नाही. त्यांचे म्हणणे आहे की, राहुलऐवजी अजिंक्य रहाणेकडे नेतृत्त्वपद द्यायला पाहिजे होते, ज्याचे नेतृत्त्वाचे आकडे शानदार आहेत. (Rahane Should Have Captain Instead Of Rahul)

हेही वाचा- कोरोनाचा विस्फोट झाल्याने बिग बॅशबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

रहाणेला करायला पाहिजे होते कर्णधार
इनसाईड क्रिकेट शोमध्ये बोलताना जाफर म्हणाले की, भारताने कर्णधार विराट कोहलीला नक्कीच मिस केले आहे, कारण त कर्णधार म्हणून मैदानावर खूप आक्रमकता आणतो. जेव्हा तुमच्याकडे मैदानावर असा खेळाडू असतो, तेव्हा तुम्हाला माहिती असते की, आपल्या चूकीनंतरही आपल्याकडे उत्तर देणारा व्यक्ती आहे. भारतीय संघाने या एनर्जीला मिस केले आहे. 

राहुलकडे नेतृत्त्वपद देण्याच्या निर्णयावर जाफर म्हणाले की, जेव्हा तुमच्याकडे अजिंक्य रहाणेारखा कर्णधार आहे, ज्याने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये एकही सामना गमावलेला नाही. त्याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकला आहे. असे असतानाही मग केएल राहुलला कर्णधार बनवण्याची काय आवश्यकता होती. मी राहुलचा विरोध करत नाहीये. तो एक युवा कर्णधार आहे आणि आयपीएलमध्ये पंजाब किंग्जचे नेतृत्त्व करण्याचा अनुभव त्याला आहे. लोक त्याला भावी कर्णधाराच्या रूपात पाहात आहेत. पण माझे असे मत आहे की, विराटच्या अनुपस्थितीत राहुलने नव्हे तर रहाणेने संघाचे नेतृत्त्व करायला पाहिजे होते. 

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाचा विस्फोट झाल्याने बिग बॅशबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

क्रिकेटवेड्या एल्गरने बालपणी मुख्याध्यापकांना म्हटले होते असे काही की सरकलेली त्यांच्या पायाखालची जमीन

खुद्द ब्रँड अँबेसेडर अमिताभ यांनाही मिळाली चुकीची माहिती, ‘या’ लीगमध्ये सहभागी नाही होणार सचिन

हेही पाहा- 

टोकियो ऑलिम्पिक... भारतीय क्रीडाक्षेत्रात इतिहास घडवणारी स्पर्धा | India at Tokyo Olympics 2020

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---