आयपीएल 2023चा मिनी लिलाव कोची येथे शुक्रवारी (दि. 23 डिसेंबर) पार पडला. या लिलावात अनेक खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांचा पाऊस पडला. त्याचवेळी वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार व आक्रमक फलंदाज निकोलस पूरन याच्यावर पुन्हा एकदा पैशाचा पाऊस पडला. सनरायझर्स हैदराबाद संघाने रिलीज केल्यानंतर या लिलावात लखनऊ सुपरजायंट्स संघाने त्याच्यावर तब्बल 16 कोटींची बोली लावली. यावर भारताच्या माजी क्रिकेटपटूने सवाल खडे केले आहेत.
निकोलस पूरन याची या लिलावात आधारभूत किंमत 2 कोटी रुपये होती. सुरुवातीला राजस्थान रॉयल्स व दिल्ली कॅपिटल्स यांनी त्याच्यासाठी बोली लावली. राजस्थानने सात कोटींवर माघार घेतल्यानंतर लखनऊ सुपरजायंट्स संघाने अत्यंत शांतपणे त्याच्यावर बोली लावणे सुरू केले. त्यांनी अखेरीस 16 कोटींची सर्वात मोठी बोली लावत त्याला आपल्या संघात सामील करून घेतले. मात्र, लखनऊ संघाची ही रणनीती भारताचा माजी सलामीवीर व पंजाब किंग्सचा फलंदाजी प्रशिक्षक वसीम जाफर याला आवडलेली नाही.
पूरनला मोठी रक्कम मिळाल्यानंतर बोलताना जाफर म्हणाला,
“लखनऊ संघाकडे शेफर्ड व सॅम्स यांच्या रूपाने दोन चांगले अष्टपैलू आहेत. पूरन हा देखील एक शानदार खेळाडू आहे. मात्र, मला पुन्हा प्रश्न पडतो की तो आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करू शकतो का? त्याची आजवरची कामगिरी अजिबात म्हणावी तशी झाली नाही. त्याच्या प्रदर्शनाच्या मानाने ही रक्कम अधिकच वाटते.
पूरन हा मागील अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स व सनरायझर्स हैदराबाद या संघासाठी खेळताना त्याने अगदी मोजक्या सामन्यांमध्ये संघाला विजयापर्यंत नेले. त्यामुळे या संघांनी त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. जाफर याच्याप्रमाणेच टॉम मूडी यांनीदेखील पूरनच्या किमतीवर आश्चर्य व्यक्त केले आहे.
(Wasim Jaffer Not Happy With Nicholas Pooran In IPL 2023 Auction)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हा कसला ऍटिट्यूड! कुलदीपला दुसऱ्या कसोटीतून डच्चू देणारा कर्णधार म्हणाला, ‘मला पश्चाताप होत नाहीये…’
‘या’ दोन चुका भारताला पडल्या असत्या महागात, पण अय्यर- अश्विनच्या भागीदारीने टाकला पडदा; जाणून घ्याच