---Advertisement---

रोहितने ‘हे’ काम केले की तो कसोटी संघात फिट बसेल

---Advertisement---

मुंबई। फलंदाजीच्या जोरावर सामना एकहाती जिंकून देण्याची गुणवत्ता असलेला भारतीय एकदिवसीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले आहेत. क्रिकेटमध्ये धावांचा रतीब घालणाऱ्या रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतक ठोकले आहेत. बदलत्या खेळपट्टीशी जुळवून घेत फलंदाजी करणे आता त्याला चांगले जमत असून सलामीचा फलंदाज म्हणून यशस्वी ठरतोय.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये तुफान फॉर्मात असलेल्या रोहितने 2019 साली दक्षिण आफ्रिकाविरुद्ध पहिले कसोटी द्विशतक ठोकले. भारताचा माजी सलामीवीर वसिम जाफर यांच्यामते, “कसोटी क्रिकेटमध्ये रोहित शर्माला पहिला एक तास मैदानावर घालवणे सर्वात मोठे आव्हान आहे. क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅटमध्ये यशस्वी ठरलेला हा खेळाडू कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी ठरू शकेल की नाही, हे आता सांगता येणार नाही. सध्यातरी तो कसोटीमध्येही चांगली कामगिरी करतोय.”

वसिम जाफर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाला की, “रोहितजवळ दक्षिण आफ्रिकाविरुद्ध ठोकलेले एकमेव कसोटी द्विशतक आणि 2 शतक आहे.  मायदेशात खोऱ्याने धावा काढल्या की धावा लोक टीका करायला लागतात. पण आपल्याला हेही पाहावे लागेल की दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज हे अनुभवी आहेत. कॅगिसो रबाडा, वर्नेन फिलेंडर हे 150 किमी वेगाने गोलंदाजी करणाऱया संघाविरुद्ध त्याने एक द्विशतक आणि दोन शतक ठोकली आहेत.

तो म्हणाला, “मला चुकीचे समजू नये. पण लोकांच्या मनात एक प्रश्न कायम मनात राहतो तो म्हणजे विदेशात त्याने किती धावा काढल्या. माझ्या विचारानुसार, कसोटीमध्ये खेळताना त्याने पहिला एक तास खेळपट्टीवर तग धरून राहणे हे त्याच्या पुढचे आव्हान आहे.”

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---