माजी सलामीवीर फलंदाज वसीम जाफर याने भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनविषयी मोठी प्रतिक्रिया दिली. मंगळवारी (20 सप्टेंबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिका सुरू झाली. जाफरचे हे वक्तव्य आगामी काळात खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर आले आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांच्यापैकी नेमके कोणाला प्लेइंग इलेव्हनमध्ये घ्यायचे, याविषयी मागच्या काही महिन्यांमध्ये पेच तयार झाल्याचे दिसते. जाफरने याच विषयावर स्वतःचे मत व्यक्त केले आहे.
वसिम जाफर (Wasim Jaffer) याच्या मते दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. दुसरीकडे रिषभ पंत (Rishabh Pant) मात्र टी-20 फॉरमॅटमध्ये समाधानकारक प्रदर्शन करू शकला नाहीये. अशात पंतला टी-20 विश्वचषकात वगळणे संघासाठी योग्य निर्णय असेल. माध्यमांशी बोलत असताना जाफर म्हणाला की, “मला वाटते अलिकडच्या काळात अक्षर पटेल (Axar Patel) याने अप्रतिम प्रदर्शन केले आहे. माहीत नाही संघ त्याच्यावर का विश्वास दाखवत नाही. त्याने स्वतःच्या फलंदाजीच्या जोरावर अनेक सामने जिंकवून दिले आहेत.”
जाफरच्या मते पंत कसोटी आणि एकदिवसीय फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी करत आहे, पण टी-20 मध्ये त्याला अशी कामगिरी करता येत नाहीये. जाफर म्हणाला की, “भारताला हे समजून घ्यावे लागेल की, रिषब पंत खेळतोय की नाही. संघ व्यवस्थापनाने पंतला संघात घेण्याचा खूप विचार केला आहे. त्याचे प्रदर्श चांगले राहिले आहे. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने काही मालिका देखील जिंकवून दिल्या आहेत. परंतु टी-20 आंतरराष्ट्रीय किंवा टी-20 मध्येही होऊ शकले नाहीये.”
“संघाने हे ठरवले पाहिजे की, पहिल्या सहामध्ये रिषभ पंतला ठेवायचे आहे की, दिनेश कार्तिकला खेळवायचे आहे. कार्तिकने आयपीएल संपल्यापासून खरोखर चांगले प्रदर्शन केले आहे. माझ्या दृष्टीने रिषभ पंत ४ किंवा ५ व्या क्रमांकावर फिट बसत नाही. त्याच्यासाठी योग्य असेल की, त्याने सलामीला यावे. पण मला नाही वाटत असे होईल. विश्वचषकात पंतला बाहेर ठेवणे योग्य असेल,” असे जाफर पुढे म्हणाला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
अखेर आयर्लंडने जाहीर केला विश्वचषकासाठी संघ; हे टी20 स्टार संघात सामील; वेस्ट इंडिजला धोका
भारत आणि पाकिस्तान यांचा आज सामना, दोघांनाही विजय मिळवणे आवश्यकच