भारत दौऱ्यावर न्यूझीलंड संघाला वनडे मालिकेत सपाटून पराभवाचा सामना करावा लागला. भारताने वनडे मालिका 3-0 ने नावावर केली होती. मात्र, शुक्रवारी (दि. 27 जानेवारी) रांची येथे 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाला पराभूत करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारताच्या या पराभवानंतर माजी सलामीवीर वसीम जाफर याने संघात एक बदल करण्याची सूचना केली आहे.
या सामन्यात भारतीय फलंदाजांनी अत्यंत कारागिरी केली. भारताचे आघाडीचे तीन फलंदाज केवळ 15 धावांमध्ये माघारी परतले होते. तसेच, हार्दिक पंड्या व दीपक हुडा हे देखील अपेक्षित कामगिरी करू शकले नाहीत. त्यामुळेच जाफर याने संघात एक अतिरिक्त फलंदाज खेळवण्याची मागणी केली आहे. तो म्हणाला,
”मला वाटते की पुढील सामन्यात उमरान मलिक याला बाहेर बसवून जितेश शर्मा याला संधी द्यायला हवी. कारण, संघाला एका अतिरिक्त फलंदाजाची गरज आहे. उमरान केवळ वेगाने टी20 क्रिकेटमध्ये यशस्वी होणार नाही. फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर तो महागडा ठरेल. त्याने या सामन्यात कटर्स टाकणे गरजेचे होते. मात्र, तो असे करण्यात अपयशी ठरला.”
उमरान मलिक याने या सामन्यात केवळ एक षटक गोलंदाजी केली. यामध्ये त्याला 16 धावा काढण्यात आलेल्या.
रांची येथे झालेल्या या सामन्यात न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत 6 बाद 176 अशी मोठी धावसंख्या उभारली. डेवॉन कॉनवे व डॅरिल मिशेल यांनी न्यूझीलंडसाठी अर्धशतके साजरी केली. भारतासाठी दोन बळी घेणारा वॉशिंग्टन सुंदर सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. या धावांचा पाठलाग करताना सूर्यकुमार यादव व वॉशिंग्टन सुंदर हेच संघर्ष करू शकले. अखेरीस न्यूझीलंडने 21 धावांनी विजय मिळवत मालिकेत आघाडी मिळवली.
(Wasim Jaffer Said Umran Malik Benched And Jitesh Sharma In For Lucknow T20I)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वनडे क्रिकेटचा सगळ्यात मोठा मॅचविनर टी20त ठरतोय फ्लॉप, करिअर येणार धोक्यात?
सगळं खोटं! ना 50 कोटींचा बंगला, ना महागड्या गाड्या; राहुल-अथियाला लग्नात दमडीही मिळाली नाही